heavy raining in nagpur news 
नागपूर

पावसानं नागपूरकरांच्या दिवसाची सुरुवात, मेघगर्जनेसह बरसल्या सरी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा तंतोतंत खरा ठरला. 18, 19 आणि 20 मार्चला विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळीच नागपुरात मेघगर्जनेनुसार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे भाजीपाला आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

नागपुरात आज सकाळपासून आकाशात ढग जमले होते. तसेच अंधार देखील पडला होता. त्यातच लॉकडाउन असल्याने नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दररोजच्या सवयींप्रमाणे नागरिक बिनधास्त मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. तसेच दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याने अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही गर्दी जमली होती. त्यातच पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. छत्र्या व रेनकोट नसल्याने अनेकांना ओल्या अंगाने घर गाठावे लागले. 

गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. त्यात आता पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. येत्या दोन दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून ही त्याची सुरुवातच म्हणावी लागेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

Rahul Dravid Son Samit Dravid: राहुल द्रविडच्या मुलाने मैदानात घातला धुमाकूळ; 360° फटकेबाजीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT