Helpline 
नागपूर

परप्रांतीय कसे परतणार घरी?हेल्पलाईनचे फोनच लागेनात!

सकाळ वृत्तसेवा

 नागपूर : परप्रांतातील मजूर, विद्यार्थी व अडकलेल्या नागरिकांना स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्यापुढे अनेक अडचणी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या मजूर, विद्यार्थ्यांना संपर्क करता यावा, यासाठी हेल्पलाईन सुरू केली. मात्र हेल्पलाईनचे तिन्ही क्रमांक 'एंगेज' येत असून मोबाईलवर कॉल केल्यानंतरही संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे कळते किंवा फोन उचललाच जात नसल्याची अनेक मजुरांची तक्रार आहे.
 शिकण्यासाठी आलेले परप्रांतीय विद्यार्थी, कामासाठी आलेले मजूर तसेच अचानक लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिका तसेच विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, विद्यार्थी, मजूर व नागरिकांना घराची ओढ लागली आहे. काहींनी तर पायीच घराकडे जाण्यासाठी पाऊले उचलली. विद्यार्थी, मजूर, नागरिकांची अस्वस्थता बघता केंद्र सरकारने त्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा केला. जिल्हा प्रशासनानेही या नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली. यासाठी एक मोबाईल क्रमांक, लँडलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले. यावर परप्रांतीय नागरिक फोन करीत आहेत. सुशिक्षित विद्यार्थी लिंकवरून फॉर्म भरून देत आहेत. मात्र मजुरांची येथे कोंडी होत आहे. त्यांना ऑनलाईनऐवजी हेल्पलाईनवर फोन करणे शक्‍य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या हेल्पलाईनचा मोबाईल क्रमांक 8142076259 असून हा फोन सातत्याने एंगेज येत आहे किंवा संपर्काबाहेर असल्याचा संदेश यावरून ऐकायला मिळत आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाचे 0712-2564973, 0712-2565092 हे फोन क्रमांकही सातत्याने एंगेज येत असल्याने दिघोरीतील 8 मजुुरांचा अद्यापही स्वगृही परतण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क झाला नाही. परिणामी या मजुरांची अस्वस्थता वाढली आहे. हे मजूर बिहारमधील आहेत. गेल्या एक महिन्यापासून ते दिघोरी येथे आहेत. संघर्ष वाहिनीने त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे. परंतु आता त्यांना घराची ओढ लागली. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाची हेल्पलाईनच त्यांच्यासाठी अडथळा ठरत आहे.

सविस्तर वाचा - हुश्श! यंदाचा उन्हाळा गाठणार म्हणे पा-याचा   उच्चांक
फोन एंगेजच
बिहारमधील या आठ मजुरांना घरी जायचे आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईनवर अनेकदा फोन केले. मीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन सातत्याने एंगेज येत आहे. जिल्हा प्रशासनाने या मजुरांचीही दखल घेत त्यांनाही स्वगृही पाठविण्यासाठी प्रक्रिया करावी.
दीनानाथ वाघमारे, संघटक, संघर्ष वाहिनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT