high court sakal
नागपूर

'ई-प्रिझन' सॉफ्टवेअरसाठी सरकारला ३ महिन्याचा अवधी : उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील कैद्यांची माहिती संग्रहीत करण्यासाठी राज्य शासनातर्फे ई-प्रिझन सॉफ्टवेअर (e prison software) तयार करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाला तीन महिन्यांचा अवधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (nagpur bench of mumbai high court) वाढवून दिला. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे नॅशनल इन्फोरमॅटीक्स सेंटर हे सॉफ्टवेअर तयार करीत आहे. नागपूर खंडपीठाने दाखल करुन घेतलेली फौजदारी जनहित याचिका प्रलंबित आहे. (high court gives three months to state government for e prison software)

या प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध एका महिला कैद्याने १० वर्षापर्यंत उच्च न्यायालयात अपील दाखल केले नव्हते. अपील दाखल झाल्यानंतर तिला निर्दोष सोडण्यात आले होते. तसेच, अन्य एका प्रकरणात अपील प्रलंबित असलेल्या एका कैद्याच्या निधनाची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली नाही. त्यामुळे, उच्च न्यायालयाने मयत कैद्याच्या अपीलवर अंतिम सुनावणी सुरू केली होती.

या दोन्ही प्रकरणांमधून कारागृह प्रशासन व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांची उदासीनता उघड झाल्यामुळे उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशामुळे राज्य सरकारने ई-प्रिझन सॉफ्टवेयर विकसित करण्याचा निर्णय घेतला. या सॉफ्टवेयरमुळे प्रशासनाला राज्यातील कोणत्या कारागृहात किती कैदी आहेत, त्यांची नावे व त्यांनी केलेले गुन्हे, त्यांना झालेली शिक्षा, शिक्षेविरुद्ध अपील केले किंवा नाही इत्यादी माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. मुग्धा चांदुरकर यांनी, शासनातर्फे ॲड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT