hinganghat case accused not attempted suicide in prision 
नागपूर

हिंगणघाटच्या आरोपीविषयी आलेली 'ती' बातमी खोटी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिच्यावर पेटोल टाकून व तिला पेटवून तिचा खून करणारा आरोपी विक्की नगराळे याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिंगणघाट जिल्हा कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. त्याने कारागृहात असताना आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पसरली होती. मात्र, विक्कीवर पोलिस चोवीस तास नजर ठेवून असल्याने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. 


गेल्या 3 फेब्रुवारीला विक्की नगराळेने प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिच्यावर पेटोल फेकले होते. त्यानंतर तिला पेटवून दिले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आठ दिवसानंतर तिचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडात आरोपी विक्की नगराळे याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली होती, परंतु जनक्षोभ पाहता विक्कीची रवानगी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. गेल्या 16 तारखेला त्याने कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अफवा उडाली होती. मात्र, विक्कीने आत्महत्येचा कोणताही प्रयत्न केला नसल्याची प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक अनुप कुंभरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 


विकेश याने सोमवारी (ता.तीन) सकाळी येथील अंकिताला पेटोल टाकून जाळले होते. घटनेच्या काही तासातच त्याला पोलिसांनी अटक केली होती. प्रारंभी त्याला शनिवार ( ता. 8) पर्यंत पोलिस कोठडी सुनावन्यात आली होती. या काळात पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला

 
हिंगणघाट जळीत प्रकरणात पीडितेच्या उपचारासाठी आलेला खर्च शासनाने परत केला आहे. उपचारासाठीचे 5 लाख 43 हजार 441 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला दिले होते. याशिवाय पीडितेच्या उपचारासाठी आधी 60 हजार रुपयांचा खर्च झाला होता. हा खर्च पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळत 60 हजारांचा धनादेश पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख सदस्य सचिव डॉ. कमलेश सोनकुरे यांनी मदतीचा धनादेश हिंगणघाट येथे पोहचून उपविभागीय अधिकारी यांच्या सुपूर्द केला. त्यांनी तो धनादेश पीडितेच्या कुटुंबीयांकडे सोपविला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT