Home Minister Anil Deshmukh's letter to Fadnavis regarding "audio clip" 
नागपूर

'ऑडिओ क्‍लिप'बाबत गृहमंत्र्यांचे फडणवीस यांना पत्र, काय म्हणाले ते...

राजेश प्रायकर

 नागपूर : "हनी ट्रॅप' प्रकरणातील "ऑडिओ क्‍लिप'संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे या प्रकरणातील आरोपीने मागील काही वर्षात केलेले प्रतापही जनतेपुढे यावे, अशी इच्छा व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठल्याही तपास संस्थेमार्फत चौकशी करण्याची तयारी असल्याचे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. एवढेच नव्हे कोरोनाच्या काळात राजकारण अपेक्षित नसल्याचा टोलाही देशमुख यांनी फडणवीस यांना हाणला. 

"हनी ट्रॅप'प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात पत्रयुद्ध सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल, 18 जुलैला पाठविलेल्या पत्राला गृहमंत्र्यांनी आज पत्रातूनच उत्तर दिले. पहिल्याच पत्रातून राजकारणाची सुरुवात केल्याने राजकीय उत्तर द्यावे लागले, असे नमूद करीत गृहमंत्री देशमुख यांनी याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले असल्याचे फडणवीस यांना सांगितले. त्यानंतरही चौकशी करणार नसाल तर मुख्य न्यायाधीश यांच्याकडे ऑडिओ क्‍लिप सादर करण्याची विनंती केली जाईल, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचेही गृहमंत्र्यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

गेल्या पाच वर्षात या प्रकरणातील आरोपीला भेटलो नसून, तो राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विनाकारण ऑडिओ क्‍लिपचा आधार घेऊन प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यावर केला आहे. चौकशी प्रक्रियेवर विश्‍वास नसल्यास आपण सुचविलेल्या कोणत्याही उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही गृहमंत्र्यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. एकूणच "हनी ट्रॅप' प्रकरणात गृहमंत्री व विरोधी पक्षनेते पत्रातून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत असल्याची चर्चा यानिमित्त राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ratnagiri Airport : एकाच वेळी 4 विमाने होणार पार्क! 72 आसनी विमानांसाठी रत्नागिरीत 25 एकरवर कसं उभं राहतंय विमानतळ? DGCA च्या परवानगीबाबत समोर आली मोठी अपडेट

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

SCROLL FOR NEXT