नागपूर

होमगार्डने केला डॉक्टर युवतीवर बलात्कार; वर्दीचा धाक दाखवून शोषण

अनिल कांबळे

नागपूर : होमगार्डने (Homeguard) डॉक्टर असलेल्या युवतीला फेसबुकवरून (Facebook) जाळ्यात ओढले. पोलिस असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक साधली. वर्दीचा धाक दाखवून मित्राच्या फ्लॅटवर नेऊन बलात्कार (Rape) केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सूरज लक्ष्मण मडावी (३१, रा. अर्जुननगर, काटोल) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Homeguard tortures doctor girl in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) मुळची कळमेश्वर तालुक्यातील आहे. तिचे वडील शेतकरी असून आई आणि बहिणीसह ती बजाजनगरात राहते. ती बजाजनगरातील डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. तिची ऑगस्ट २०१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सूरज मडावीसोबत ओळख झाली. त्याने तिच्याशी फेसबुकवर चॅटिंग करीत पोलिस खात्यात नोकरीवर असल्याचे सांगितले. त्याने वर्दीत काही फोटोही तिला पाठवले. त्यामुळे तिने सूरजशी मैत्री केली.

दोघांचे संबंध वाढत गेले. त्याने रियाच्या कुटुंबीयांची माहिती काढली. त्याने तिला जाळ्यात ओढले. तिला भेटायला बोलावले. खाकी पॅंटवर तो भेटायला आला. त्यामुळे तो पोलिस असल्याचे तिला वाटले. त्याने तिला प्रपोज केले आणि लग्नाची मागणी घातली. तिनेही सरकारी सेवेतील पती मिळत असल्यामुळे लगेच होकार दिला.

तिने आई-वडिलांनाही सूरजबाबत माहिती दिली. त्यांनीही मुलीला होकार दिला. दरम्यान, सूरजने तिला लग्नाबाबत बोलायचे असल्याचे सांगून नरेंद्रनगर येथील गोदावरी अपार्टमेंट असलेल्या मित्राच्या फ्लॅटवर नेले. तेथे तिच्याशी काही तास गप्पा केल्यानंतर शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता पुढच्याच महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने नकार दिल्यानंतरही सूरजने तिच्यावर बलात्कार केला.

वारंवार लैंगिक शोषण

सूरज हा रियाला वारंवार मित्राच्या फ्लॅटवर आणि लॉजवर नेऊ लागला. रियाने नकार दिल्यास वर्दीची धमकी देत होता. तसेच लग्न करणार नाही, असे सांगून तिला बळजबरी फ्लॅटवर नेऊन वारंवार लैंगिक शोषण करीत होता. रियाने त्याला लग्नाबाबत विचारले असता, त्याने चक्क नकार दिला. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणीने अजनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी सूरज याला अटक केली.

(Homeguard tortures doctor girl in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT