hotels will get industry status from 1 april nagpur news 
नागपूर

हॉटेल व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी, उद्योग दर्जासोबतच 'या' करांमध्ये सवलत

राजेश रामपूरकर

नागपूर : हॉटेल व्यवसायाला एक एप्रिलपासून उद्योगाचा दर्जा देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत हॉटेल्सला उद्योगांप्रमाणे प्रॉपर्टी कर, पाणी आणि वीजदरात सवलत मिळणार आहे. कोरोना काळात याच उद्योगाला सर्वाधिक व सर्वप्रथम फटका बसला होता. या निर्णयामुळे या उद्योगाला दिलासा मिळाला आहे. 

केंद्र सरकारच्या निर्णयांतर्गत पहिल्या टप्प्यात पर्यटन मंत्रालयांतर्गत नोंदणीकृत हॉटेल्सला याचा लाभ मिळणार आहे. औद्योगिक दर्जानुसार हॉटेल्सला वीजदर, वीजशुल्क, पाणी व संपत्ती कर, विकास कराची वसुली व्यावसायिकाऐवजी औद्योगिक दराने सवलतीत होणार आहे. पण जे हॉटेल केंद्रीय पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांना लाभ देण्यासाठी एक समितीची बनविण्याची घोषणा केंद्राने केली होती. पण दोन महिन्यानंतरही समिती तयार झाली नाही. त्यामुळे नोंदणीबाहेरील हॉटेल्सला औद्योगिक दर्जाचा लाभ मिळेल वा नाही, हा प्रश्न आहे. समिती नोंदणीबाहेरील हॉटेल्सला औद्योगिक दर्जा देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहेत. त्यानंतर ऑनलाइन अर्ज मागवून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आणि अटी पूर्ण करणाऱ्या हॉटेल्सला औद्योगिक दर्जाचा लाभ मिळेल. विदर्भातही स्टार हॉटेल्स आहेत. याशिवाय पर्यटन क्षेत्रांतर्गत पेंच, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बोरधरण, कऱ्हांडला, नवेगाव बांध या ठिकाणी हॉटेल्स आहेत. या ठिकाणी जाणारे पर्यटक येथील हॉटेल्समध्ये मुक्कामी असतात. सरकारच्या निर्णयाने हॉटेलला फायदा होणार आहे. नोंदणीकृत हॉटेलला कमी व्याजदरात बँकांचे कर्ज आणि करात सूट मिळेल. 

नोंदणी करणे आवश्यक - 
हॉटेल्सला औद्योगिक दर्जा देण्यासंदर्भात जीआर आला आहे. पण केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत हॉटेल्सला याचा लाभ मिळणार आहे. फायद्यासाठी हॉटेलला नोंदणी करणे आवश्यक आहे. नागपुरात २२५ नोंदणीकृत हॉटेल आहेत. नोंदणीबाहेरील हॉटेलला दर्जा देण्यासाठी अजूनही समितीची स्थापना झालेली नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे आली नाहीत. कोरोना काळात हॉटेल व्यवसायाला सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे सर्व हॉटेल्सला औद्योगिक दर्जा द्यावा, अशी मागणी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशनने केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT