How to get light of education in tribal areas 
नागपूर

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत सरकारचा ऑनलाईन खेळ, वाचा संपूर्ण प्रकार...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली आहे. मात्र, दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि संसाधने नसल्याने येथील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश कसा पोहोचणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावरून सरकार आदिवासी विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन खेळ तर खेळत नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी 1972-73 पासून महाराष्ट्र सरकारने आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केली. याशिवाय 1990-91 पासून 'एकलव्य निवासी शाळा' हा उपक्रम केंद्र सरकारच्या सहकार्याने तर 'नामांकित शाळा इंग्रजी माध्यम शिक्षण योजना' 2014 पासून सुरू करण्यात आली.

या योजनांमधून हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनामुळे 17 मार्चपासून नियमित शाळा व वसतिगृह बंद आहेत. मुलांचे शिक्षण, भोजन नि:शुल्क असल्यामुळे गरीब आदिवासी पालकांना मुलांची विशेष काळजी नव्हती. परंतु, आता शाळा बंद असल्यामुळे मुले घरी आहेत. एक जुलैपासून शहरातील बहुतेक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेणे सुरू केले. मात्र, आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत.

आदिवासींच्या 95 टक्के पालकांकडे स्मार्ट फोन, मोबाईल नेटवर्क, मोबाईल रिचार्जसाठी रोख रक्कम नाही, पाठ्यपुस्तके नाहीत, घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही. मार्च ते जून असे चार महिने अभ्यास नसल्यामुळे बरेच आदिवासी विद्यार्थी शेतीकाम, इतर किरकोळ काम, पालकांच्या कामात मदत करीत आहेत. याचे दुर्गामी परिणाम आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासावर होईल, अशी भीती आहे.

सरकारने घ्यावा पुढाकार

राज्यात ज्याप्रमाणे ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने टीव्ही आणि रेडिओ चॅनलची सुरुवात केली. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांसाठीही सुविधा उपलब्ध करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

लोक मला आजही शिव्या देतात... अनाजी पंत साकारल्यानंतर महेश कोकाटेंनी व्यक्त केली खंत; म्हणतात-

SCROLL FOR NEXT