Blood-Bank
Blood-Bank 
नागपूर

पैसे नसल्याने कसे विकत आणायचे रक्त?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकदा सिकलसेल झाल्याचे निदान झाले की, मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. मात्र या सिकलसेलग्रस्तांना शासनाने मोफत रक्त उपलब्ध करून देण्यापासून तर उपचारही मोफत मिळावेत असे नियम सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमातून घालून दिले. मात्र या योजनांना शासनाच्याच संस्थांमध्ये हरताळ फासला जातो. मेडिकल असो की, मेयो येथे मोफत रक्त मिळत नाही. यामुळे रात्रीच्या वेळी सिकलसेलग्रस्तांच्या नातेवाइकांनाच रक्ताची जमवाजमव करण्यासाठी डॉक्टर फर्मान सोडतात. नातेवाईक खाली मान घालून खासगी रक्तपेढ्यातून रक्त आणतात.

महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांमध्ये सिकलसेल मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यातही विदर्भात सर्वाधिक सिकलसेलचे रुग्ण आहेत. जंगल, पहाड व ग्रामीण तसेच सर्वच जातीधर्मातील लोक अलीकडे आढळून येत आहेत. महाराष्ट्र शासनाने २००० मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याची घोषणा केली होती. मात्र वॉर्ड तयार झाले नाही. डे केअरची संकल्पना पुढे आली. दरवर्षी सिकलसेलचे पन्नास हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून येतात. यातील एसएस पॅटर्न असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. गरिबांचा आजार असल्याने केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाकडून रुग्णांना मदत मिळते. मोफत रक्त उपलब्ध करून द्यावे असे नियम आहेत, मात्र या नियमांची अंमलबजावणीच होत नाही.

रक्ताची गरज रात्रीच का भासते?

मेडिकलमध्ये एक तरुणी दाखल आहे. तिला रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष असे की, डॉक्टरांनी सिकलसेलग्रस्त तरुणीच्या नातेवाइकांना रात्री दहा वाजता रक्ताची गरज असल्याचे सांगितले. बाहेरगावचे नातेवाईक रक्तासाठी ओळख नसलेल्या शहरात धावाधाव करतात. खासगी रक्तपेढीतून रक्त आणा, असे सांगण्यात आले, परंतु पैसे नसल्याने रक्ताची जुळवाजुळव नातेवाईक करू शकले नाही. रात्रीच्याच वेळी रुग्णांच्या नातेवाइकांना रक्ताची गरज असल्याचे का सांगण्यात येते, असा सवाल वंचितचे सिद्धांत पाटील यांनी केला.

नुकतेच एका सिकलसेलग्रस्त मुलीला रक्ताची गरज होती, मात्र मेडिकलमध्ये रक्त उपलब्ध असताना रक्त दिले नाही. अखेर रक्तदात्याची जुळवाजुळव करावी लागली. मात्र गरिबांजवळ पैसा असेलच असे नाही. अशावेळी गरिबांनी रक्त उपलब्ध न झाल्यास प्राण गमवावे का? खासगी रक्तपेढ्यांमधून रक्त विकत आणण्यासाठी एजंट येथे फिरत असतात.

-अनिकेत कुत्तरमारे, समता सैनिक दल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT