Husband and wife raped her girlfriend by showing Blue film 
नागपूर

विश्‍वास बसेल का? ब्ल्यू फिल्म दाखवून पती-पत्नीने केला मैत्रिणीवर बलात्कार 

अनिल कांबळे

नागपूर : मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म दाखवून पती-पत्नीने मैत्रिणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगरात उघडकीस आली आहे. पती-पत्नीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय मीना (बदललेले नाव) ही अजनीत राहते. ती होमपेशंटचे काम करते. 2011 ला तिच्या आईच्या घरी रामकिशन शोपालराम जांगीड (वय 44) व पत्नी सरोज रामकिशन जांगीड (वय 40, रा. शांतीविहार रेसिडेन्सी, दाते ले-आउट, सोनेगाव) हे किरायाने राहायला आले. रामकिशन हा फर्निचरचे ठेके घेतो. सरोज आणि मीना यांची मैत्री झाली. दोघीही एकमेकींना घरकामात मदत करीत होत्या.

सरोजने पती बाहेर गेल्यानंतर मीनाला घरी बोलावले. तिला समलैंगिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर ती वारंवार शारीरिक संबंधासाठी बळजबरी करू लागली. नंतर सहमतीने दोघीही शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होत्या. सरोजने कट रचून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना पतीला घरात बोलावले. दोघीही बेडवर नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर तो पत्नीवर ओरडला. 

त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला. अन्यथा आई आणि भावाला सांगण्याची धमकी दिली. रामकिशन बलात्कार करीत असताना पत्नी सरोजने मोबाईलने व्हिडिओ आणि फोटो काढले. तेव्हापासून दोघेही पती-पत्नी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ब्लॅकमेल करायला लागले. अन्यथा सोशल मीडियावर ब्ल्यू फिल्म व्हायरल करण्याची धमकी देत होते.

लग्नाचे दिले आमिष

रामकिशनने मीनाला लग्नाचे आमिष दिले. पत्नी सरोजने दोघांशीही शारीरिक संबंध ठेवण्याची अट ठेवली. जांगीड दाम्पत्याने रूम बदलवली आणि सोनेगावमध्ये राहायला गेले. रामकिशन आणि सरोज यांनी मीनाला वारंवार घरी बोलावून बलात्कार केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. 

समलैंगिक विवाह

सरोज जांगीडने समलैंगिक विवाह करण्यासाठी मीनावर दबाव टाकला. रामकिशनने 500 रुपयांचे दोन स्टॅंप आणले. त्यावर सरोज आणि मीना या दोघी समलैंगिक विवाह करीत असल्याचे संमतीपत्र बळजबरीने लिहून घेतले. त्यानंतर सरोजची पत्नी असल्याचे सांगून रामकिशनने मीनाला घरी राहायला नेले. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर बलात्कार करीत लैंगिक शोषण केले. याप्रकरणी मीनाच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी रामकिशन आणि सरोज या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT