Husband viral photos of wife on social media in nagpur  
नागपूर

पत्नीचे अश्‍लील फोटो फेसबुकवर व्हायरल; राजस्थानात राहणाऱ्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल

अनिल कांबळे

नागपूर : पत्नीशी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी पतीने पत्नीचे अश्‍लील फोटो, आक्षेपार्ह मॅसेज फेसबुकवर व्हायरल केले. फोटो टॅग केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेश लक्ष्मीचंद सुमन (३७, कोटा, राजस्थान) असे आरोपी पतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीनगर येथे राहणाऱ्‍या एका २५ वर्षीय तरुणीचे २०१५ साली सुरेशसोबत लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षाची मुलगा आहे. मुलगी झाल्यानंतर सुरेश हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ व मारहाण करीत होता. पत्नीच्या तक्रारीवरून राजस्थान पोलिसांनी सुरेशवर गुन्हा दाखल केला आहे. 

चार वर्षांपूर्वी पतीला सोडून ती मुलासह आपल्या माहेरी पंचवटीनगर येथे आली होती. परंतु, तिचा मोबाईल सुरेशच्या घरीच राहिला होता. सुरेशने पत्नीच्या मोबाईलवर फेसबुकच्या माध्यमातून तिचे बनावट अकाऊंट तयार केले. त्या खात्यातून त्याने पत्नीच्या ओळखीच्या लोकांना अश्लिल फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर टाकायला सुरूवात केली.

काही दिवसांपूर्वी राजस्थान येथून पत्नीच्या ओळखीचा एक युवक नागपूरला आणि त्याने पीडित महिलेची भेट घेऊन तिला सविस्तर हकिकत सांगितली. पत्नीची बदनामी व्हावी या हेतूने त्याने हे कृत्य केल्याचे पत्नीच्या लक्षात आले. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT