nagpur university 
नागपूर

संचारबंदी हटल्यास या कालावधीत होऊ शकतात नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशभरात संचारबंदी असल्याने विद्यापीठे, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या. 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. 15 मे ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यातील सर्वच विद्यापीठांमधील परीक्षा घेण्याची तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत यांनी राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंना "व्हीडिओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यमातून दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

राज्यात 16 मार्चला तर देशभरात 18 मार्चला जमावबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सोडून सर्व दुकाने, महाविद्यालये, शाळा बंद केल्या. विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यात 13 अकृषी, तीन कृषी, एक आरोग्य विज्ञान, मत्स्य व पशुसंवर्धन आणि तंत्रशास्त्र विद्यापीठाचा समावेश आहे. यातून जवळपास वीस ते तीस लाखांवर विद्यार्थी शिकतात.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंतांचे तयारी ठेवण्याचे आदेश
विशेष म्हणजे, विद्यापीठांची सर्व प्रशासकीय कामे या प्रकाराने खोळंबली आहेत. विद्यापीठासाठी परीक्षा सर्वाधिक महत्त्वपूर्ण असल्याने त्या रद्द करता येणे अशक्‍य आहे. यावेळी विद्यापीठांच्या ऍकेडमिक कॅलेंडरची अंमलबजावणी, भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी विद्यापीठाद्वारे आपत्ती व्यवस्थापन यावरही चर्चा करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत, सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ उपस्थित होते. यावेळी उदय सावंत यांनी सर्व कुलगुरूंचे मत ऐकून घेतले. संचारबंदी वाढल्यास तारखांमध्ये बदल होण्याचीही शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे उद्या सर्वच कुलगुरू राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याशी "व्हीडिओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

संचारबंदी हटल्यावरही परीक्षा लांबणार
विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 14 एप्रिलनंतर संचारबंदी हटल्यावर लगेच परीक्षा घेणे शक्‍य नसल्याचे मत कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत यांच्यासमोर मांडले. सध्या कोरोना संपला नसल्याने "सोशल डिस्टन्सिंग'आवश्यक आहे. विद्यापीठात विद्यार्थी नसून ते आपापल्या गावी आहेत. त्यांचे ट्रान्सपोर्टटेशन, वसतिगृहे, महाविद्यालये सॅनेटाईझ करणे याला बराच कालावधी लागणार असल्याने किमान दीड महिना परीक्षा घेता येणे शक्‍य नसल्याचेही डॉ. काणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT