file 
नागपूर

भाऊ हरभरा तर विक्रीसाठी आला, कापसाचे काय रे ?

सतिश तुळस्कर

उमरेड (जि.नागपूर) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने हरभरा विक्रीस मंजुरी दिली. समितीत पहिल्याच दिवशी आठ हजार क्‍विंटल हरभरा विक्रीसाठी आला. परंतु, कापूस केंद्र सुरू न झाल्याने हजारो क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याची वस्तुस्थिती आहे. शासनाने पणन मंडळास खरेदीची परवानगी दिल्यास कापसाचा भार हलका होऊ शकतो, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेची घेतली जाते खबरदारी
उमरेड उपविभागातील अतिमहत्त्वाची व जादा उत्पन्नाची ही बाजार समिती आहे. उमरेड, भिवापूर व कुही या तीन तालुक्‍यांतच नव्हे, तर आसपासच्या अन्य ठिकाणांहून शेतकरी मोठ्या संख्येने शेतमाल घेऊन येतात. अशातच सद्यस्थितीत सुरू असलेले कोरोना व्हायरस व लॉकडाउनचा विचार करता बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू तथा समस्त संचालक मंडळ व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या नियोजित निर्णयानुसार बाजार समितीत गर्दी वाढली. सोशल डिस्टन्सिंगची व स्वच्छतेची काळजी घेता येईल, या उद्देशाने विषम पद्धतीने यार्डातील प्लॅटफॉर्म शेतमाल खरेदी-विक्रीसाठी खुले राहतील, असे परिपत्रक काढले.

साडे तिन ते चार हजार भाव
गुरुवारी (ता. 16) बाजार समितीच्या यार्डात दिवसभरात झालेली हरभऱ्याची आवक एकूण आठ हजार क्विंटल झाली असून त्यास 3,500 ते 4,000 रुपये असा भाव देण्यात आल्याचे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. योजनाबद्ध पद्धतीने घेण्यात येणारा हा पहिलाच बाजार या दिवशी प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 3,5 व 8 अशा विषम क्रमवारीत मालाची खरेदी-विक्री करण्यात आली. पुढे येणारे सात बाजार म्हणजे 2 मेपर्यंत येणारा प्रत्येक मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी बाजार खुला करण्यात येईल आणि शेतकरी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी घेउन येऊ शकतील.


अधिक वाचा  :   vedio ः शासनाचे सर्व आदेश पाळून उरकले विवाहकार्य

सॅनिटाइझर व हात धुण्याची व्यवस्था
बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या वाहनांवर सॅनिटायझर फवारणी आणि शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची सोय करण्यात आली असून या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्याच्या तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधलेला असेल फक्त अशांनाच आत प्रवेश दिला गेल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बाजार समितीच्या यार्डात बोलीदरम्यान शेतकऱ्यांना विशेष अंतर ठेवून रांगेत उभे राहता येईल यासाठी लोखंडी कठडे उभे करण्यात आले होते.

शेकडो क्‍विंटल कापूस घरात
घरी शेतातून काढलेला कापूस पडून आहे. बाजार समितीत कापसाला मागणी नसून भावही नाही. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीविना शेकडो क्विंटल कापूस पडून आहे. तेव्हा लवकरात लवकर त्याची खरेदी सुरू करून योग्य भाव द्यावा आणि आमची आर्थिक अडचण दूर करावी.
-श्री. ठाकरे
युवा शेतकरी, पिराया

पणन केंद्र सुरू करावे !
शासनाने पणन केंद्र खरेदी सुरू केलं तर समितीवरचा भार कमी होईल. शासनाने कापसाला भाव वाढ द्यावी. आधी भाव चांगला होता आता कमी आहे.
-रूपचंद कडू
सभापती, बाजार समिती
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT