If you want to be a guide, this must come ... Now something new! 
नागपूर

गाईड व्हायचे असेल तर हे आलेच पाहिजे...आता आणखीच काहीतरी नवे!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता गाइड व्हायचे असेल तर बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच हिंदी आणि मराठी भाषेसह इंग्रजीचे पुरेसे ज्ञान असणे बंधनकारक आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे त्यांचे आदरतिथ्य योग्य पद्धतीने व्हावे या उद्देशाने यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांचे चांगले स्वागत करण्याच्या दृष्टीने गाइड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नवीन गाइड घेण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक सूचना दिल्या होत्या. त्यात मराठी आणि हिंदी या भाषेत चांगला संवाद साधण्याचे कौशल्य आणि इंग्रजीचे जुजबी ज्ञान असणे, 21 वर्षे पूर्ण असणे, वन गुन्हा नसणे आणि वन कायद्याचे उल्लंघन झालेले नसणे आदींचा समावेश होता. त्यानुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी आदेश दिले आहेत. त्यात गाइड व जिप्सी चालक व मालकांकडून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणत्याही शासकीय व वन जमिनीवर अतिक्रमण केले नसल्याचे हमीपत्र 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भरून देण्याची सक्ती केली आहे. विद्यमान गाइड आणि जिप्सी चालकांनाही आजपर्यंत हमी पत्र द्यायचे होते. अद्याप किती जणांनी हमीपत्र दिले, हे अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, याला महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईड्‌स युनियनने विरोध केला आहे. हे आदेश मागे घेण्याची मागणीही केलेली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अनिल तिवाडे म्हणाले, देशातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने जाहीर होण्यापूर्वीपासून अनेक गाईड व जिप्सी चालक व मालक हे त्यालगतच्या गावातील रहिवासी आहेत. ही गावे वन जमिनीवरच वसलेली आहेत. देशात 2006 साली आदिवासी वनाधिकार कायदा पारित केल्यानंतर गैरआदिवासीसाठी तर त्या वन नियमितीकरणाची तरतूद नाही. पण, आदिवासींचेही अनेक वनदावे प्रलंबित आहेत. गाइड व जिप्सी चालक व मालकांची भरती त्या-त्या अभयारण्य अथवा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातून करण्यात येत असल्यानेही असे निकष लावल्यास स्थानिक गावकरी चालक व गाइडचा रोजगार गमावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Discount Offer : लवकरच वाढणार iPhone 17 Pro Max ची किंमत! त्याआधी मिळतोय बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी गर्दी, 'इथे' सुरुय ऑफर

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी - उद्धव ठाकरे

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

SCROLL FOR NEXT