Improve now though ... Otherwise the action will take place 
नागपूर

आता तरी सुधरा ना...नाहीतर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  स्वच्छता अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असतानाही शहरातील नागरिकांवर त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांवर बिनधास्तपणे थुंकणे, लघुशंका करणे सुरूच असून आज उपद्रव शोध पथकाने 36 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 5 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला.

रस्ते, फुटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून शहर विद्रूप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेने उपद्रव शोधपथक नियुक्त केले असून नियमित कारवाई सुरू आहे. प्रत्येक झोनमध्ये 10 पथके तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात एक पथक प्रमुख, चार मदतनिसांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी संविधान चौकात शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाईत सातत्य राखत आज इंदोरा परिसरात कारवाई करण्यात आली. इंदोरा कामठी रोड, ट्राफिक सिग्नल परिसरात कारवाई करण्यात आली. खर्रा खाऊन थुंकणारे, पॉलिथिन रस्त्यावर टाकणे, उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 36 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण पाच हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला.

यात सार्वजनिक ठिकाणी थुंकताना 17 जण आढळून आले. त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे एकूण तीन हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. फुटपाथ आणि मोकळ्या ठिकाणी कचरा टाकताना 18 जण आढळून आले. त्यांच्याकडून प्रति व्यक्ती 100 रुपये प्रमाणे 1800 रुपये वसूल करण्यात आले. रस्त्याच्या कडेला लघुशंका करणाऱ्या एका जणाकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today : नाताळाच्या एक दिवस आधी सोने ४ हजारांनी महागले, चांदीतही ९ हजारांची वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

होऊदे खर्च! ७ कोटींना नव्या थार गाड्यांची खरेदी, मॉडिफिकेशनवर ५ कोटी खर्च; वन विभागाची उधळपट्टी, चौकशीचे आदेश

CJI Suryakant: ‘केस जिंकण्यापलीकडे काहीतरी मोठं…’ ; भारताच्या भविष्यासाठी CJI सूर्यकांतांनी वकिलांना दिला वेगळाच फॉर्म्युला

Cold Wave Maharashtra : राज्यात हवामान बदल; कोकणात गारठा, पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा; मुंबईच्या राजकारणाला मिळणार नवे वळण

SCROLL FOR NEXT