नागपूर

नागपूर: वेडसर महिलेला आपुलकीचा ओलावा

योगेश बरवड, नागपूर

वेडसर महिलेची काळजी घेत त्यांनी मानवसेवाच श्रेष्ठ असल्याचे कृतीतून दर्शविले.

नागपूर: खाकी वर्दीतील व्यक्ती म्हणजे केवळ धाकदपटशा करण्यासाठी नसतात. त्यांच्यातही माणुसकी आणि मायेचा ओलावा असतो. तीन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर भटकत असलेल्या आणि अंगावर अळ्या पडलेल्या महिलेला आंघोळ घालत तिच्यावर उपचार करवून घेतले. वेडसर महिलेची काळजी घेत त्यांनी मानवसेवाच श्रेष्ठ असल्याचे कृतीतून दर्शविले.

बेघर, निराधारांसाठी रेल्वेस्थानक हक्काचे ठिकाण. सुरक्षित निवारा आणि पोटाची खळगी भरते म्हणून बेघर इथे येतात. साधारण ३५ ते ४० वर्षे वयोगटातील ही महिलासुद्धा तशीच पोहोचली असावी. कपड्यासहीत अंग पूर्ण मळलेले. शरीरावर अळ्या रेंगत होत्या. ती एका कोपऱ्यात बसून होती. भिरभिरत्या नजरेने ती केवळ येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघायची. काही खायला मिळेल आणि पोटातील आग कमी होईल, येवढीच तिची माफक अपेक्षा. नागपूर लोहमार्ग ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी स्वामी, भलावी, साबळे या २५ ऑगस्ट रोजी फलाटावर गस्त घालत असताना महिलेकडे लक्ष गेले.

विचारपूस केली पण तिला काहीच सांगता येत नव्हते. सर्वांची मने द्रवली. खाकीतील माणुसकी मदतीला धावून आली. तिघींनीही स्वतःच्या हाताने आंघोळ घालून अंग स्वच्छ केले. पाठीला फोड झाले असून त्यात अळ्या पडल्या होत्या. तिला वेदनाही होत होत्या. या महिलेला तातडीने मेयोत रुग्णालयात नेऊन उपचार मिळवून दिले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेला मदतीचा हात रेल्वे स्थानकाच्या वर्तुळात कौतुकाचा विषय ठरला आहे.

गळ्यात चावी

ही महिला कोण, कुठली, इथे पोहोचली कशी कुणालाच ठावूक नाही. ओळख पटेल असे काहीच तिच्याकडे नाही. केवळ लॉकेटसारखी एक चावीच तिच्या गळ्यात आहे. ही चावी नशिबाचे कुलूप उघडून आप्तेष्टांची भेट घडवून देऊ शकेल काय या प्रश्नाचे उत्तर भविष्याच्या गर्तेतच दडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT