univercity 
नागपूर

दीक्षांत समारंभात कोणाला पदक द्यायचे? विद्यापीठाला पडला प्रश्न

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) ऑनलाइन परीक्षेतील उणिवांमुळे अनेक विद्यार्थ्यांना सारखेच गुण (Same marks to students) देण्यात आले आहे. त्यामुळे दीक्षांत सोहळ्यामध्ये पदक व पारितोषिकांसाठी कोणाची निवड करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये (University Convocation Ceremony) अंतिम वर्षात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण, कांस्य पदक आणि पारितोषिक देऊन गौरव केला जातो. (Increased-headaches-of-the-university-due-to-the-same-marks)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा घेण्यात आल्या. नागपूर विद्यापीठाने या परीक्षा ऑनलाइन घेताना त्यामध्ये कुठलेही ऋणात्मक गुण ठेवले नाही. शिवाय ५० पैकी केवळ २५ प्रश्न सोडवण्याची मुभा दिली. त्यातच ऑनलाइन परीक्षेमध्ये गैरप्रकाराचे प्रमाणही अधिक होते. एकूणच विद्यापीठाच्या निकालामध्ये भरमसाठ वाढ झाली.

अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळाले. जे विद्यार्थी कधीही ४० ते ५० गुणांच्या वर घेऊ शकले नाहीत त्यांनाही १०० गुण मिळाले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आता अनेक अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे गुण हे सारखे आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये अंतिम वर्षात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण, कांस्य पदक आणि पारितोषिक देऊन गौरव केला जातो.

मात्र, आता एका अभ्यासक्रमामध्ये पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना सारखे गुण आहेत. त्यामुळे पदकासाठी निवड कुणाची करावी असा प्रश्न समितीला पडला आहे. विद्यापीठाने सारखे गुण असल्यास काय करावे यासाठी नियमावली तयार केली असली तरी एका अभ्यासक्रमात पंधरा विद्यार्थ्यांना सारखे गुण असल्याने विद्यापीठाची चांगलीच तारांबळ उडाली झाली आहे.

(Increased-headaches-of-the-university-due-to-the-same-marks)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT