increased postgraduate seats to be filled at the university level in nagpur 
नागपूर

विद्यापीठस्तरावर भरणार पदव्युत्तरच्या वाढीव जागा, काही महाविद्यालयांचा विरोध

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उपलब्ध जागांपेक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तिप्पट असल्याने शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. यंदा पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये २० टक्के वाढ करण्यात येणार आहे. मात्र, या जागा महाविद्यालयस्तरावर नाही तर विद्यापीठ स्वतः भरणार आहे. त्यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांकडून वाढीव जागांसाठी विचारणा करणार आहे. याबाबत मंगळवारी विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

विद्यापीठाच्या परीक्षांमध्येही कधी नव्हे ते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यामुळे पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये २० टक्के वाढ करा, अशी मागणी युवासेना, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचा पदाधिकाऱ्यांनी केली होती. व्यवस्थापन परिषदेत ज्या ठिकाणी विज्ञान आणि वाणिज्य विषयाच्या जागा रिक्त आहेत, त्या जागा भरण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली. याशिवाय ज्यांना प्रवेश मिळालेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा वाढवून देण्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी मान्य केले. आज याबाबत विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, या निर्णयाला काही महाविद्यालयांनी विरोध केला असल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT