Increased security at the residences of Deshmukh and Fadnavis 
नागपूर

खबरदारी! देशमुख व फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ; तगड्या बंदोबस्ताने आले छावणीचे स्वरूप

अनिल कांबळे

नागपूर : राज्यातील तापलेले राजकीय वातावरण आणि विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. निवासस्थानासमोर मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करीत पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहेत. विरोधी पक्षाला आयतीच संधी मिळाल्यामुळे देशमुख यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. देशमुख यांनीसुद्धा विरोधी पक्षाला तोडीस तोड उत्तर देत किल्ला लढविला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे प्रकरण आणि शंभर कोटींची वसुलीचे आरोप लावले आहेत. महाविकासआघाडीची सावध भूमिका आणि विरोधी पक्षाच्या आक्रमतेमुळे उपराजधानीतील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप पक्षाने रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आंदोलन केले होते तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेसुद्धा संविधान चौकात परमबीर सिंग विरोधात जोरदार आंदोलन केले.

उपराजधानीतील तापलेले वातावरण बघता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गृहमंत्री देशमुख आणि फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले. सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या घराजवळ बॅरिकेडिंग केली. घराकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच निवासस्थानाला छावणीचे स्वरूप आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT