nitin-gadkari-
nitin-gadkari- 
नागपूर

ते म्हणाले मोदींच्या नेतृत्वात देश अधिक शक्तिशाली बनेल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जुन्या कार्यकर्त्यांच्या त्याग, बलिदानामुळेच आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना या संकटातूनही आपण बाहेर पडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा देश सुपर इकॉनॉमिक पॉवर होईल, असा संकल्प करू या, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
एका संदेशाद्वारे त्यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गडकरी म्हणाले, केवळ सत्ता परिवर्तनासाठी भाजपची स्थापना झालेली नाही, तर समाजिक परीवर्तनाच्या मनीषेने स्थापना झाली आहे. श्‍यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटलजी, अडवाणीजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुरू आहे. काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्यात आले. मूळ भारतीयांना निवासाचा हक्क मिळावा म्हणून नागरी कायदा पारीत झाला आहे. प्रगती आणि विकासाकडे देशाची वाटचाल सुरू आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जनतेसोबत उभे राहावे

आज देश कोरोनाशी संघर्ष करीत आहे. यावरही आम्ही मात करू. सोशल डिस्टन्सिंग करून. आजच्या स्थितीत ज्यांची खाण्याची व्यवस्था नाही अशा गरिबांची कार्यकर्त्यांनी सेवा करावी. आपण जनतेसोबत उभे राहावे. लोकसेवा, लोकशिक्षण, लोकसंघर्ष या त्रिसूत्रीवर भाजप उभा आहे. सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने जे मागासले आहेत अशा लोकांसोबत उभे राहणे, त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. कोरोनाच्या संकटावर आपण निश्‍चित मात करू असा विश्वासही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT