indian post  sakal
नागपूर

Indian Post : आता घरबसल्या मिळवा टपाल खात्याची सेवा

‘क्लिक ॲंड बुक’ नावाने नवी योजना; वेबसाईटच्या माध्यमातून पार्सलनोंदणी सुविधा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पत्र व्यवहार म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते पोस्ट ऑफिस. साहजिकच पत्र किंवा कुरिअर करायचे झाल्यास आपण आजवर जवळचे टपाल कार्यालय गाठत होतो. स्पर्धेच्या या युगात टपाल खात्याने घरबसल्या ही सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क्लिक ॲंड बुक’च्या माध्यमातून आता आपल्या कुरिअरची नोंदणी केल्यास पोस्टमन आपल्या घरी येऊन ते कुरिअर घेईल आणि नियोजित स्थळी पोहोचवेल.

टपाल खात आजपासून शुक्रवारपर्यंत (ता. १३) ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ साजरा करीत आहे. यानिमित्त ही योजना उपलब्ध करून देण्यात आली असून, या सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनी ही माहिती दिली. जमाना व्हाट्सएपचा असला तरी, स्पर्धेच्या या युगात टपाल खात्याने आपला जम बसवला आहे. कुठल्या ना कुठल्या योजनांच्या माध्यमातून खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी टपाल खाते करताना दिसते. एरवी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना,

पासपोर्ट अशी शासकीय कागदपत्रे पोहोचविण्यात व्यस्त असलेल्या या खात्याने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘क्लिक ॲंड बुक’ ही नवी योजना आणली आहे. या सप्ताहामध्ये टपाल खाते उद्या वित्तीय सशक्तीकरण दिवस, बुधवारी पत्रव्यवहार दिवस, गुरुवारी मेल व पार्सल दिवस आणि शुक्रवारी अंत्योदय दिवस साजरा करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला नागपूर शहर वरिष्ठ अधीक्षक रेखा रिझवी उपस्थित होत्या.

शहरातील २९ कार्यालयांकडून सुविधा जागतिक टपालदिनाचे औचित्य साधत सोमवारी टपाल खात्याने ही योजना सुररू केली असली तरी, नागपूरमध्ये तुर्तास शहरापूरती ही योजना मर्यादित आहे. पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत शहरातील २९ कार्यालयांतर्गत ही सेवा ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली. या कार्यालयांच्या १० किलोमीटरच्या परिघात असणारे ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

त्यासाठी www.indiapost.gov.in या वेबसाईटवरील ‘क्लिक ॲंड बुक’ या पर्यायावर आपला पीन कोड दाखल करीत या योजनेचा लाभ घेता येईल. देशातील १ हजारपेक्षा जास्त टपाल कार्यालयांतर्गत ‘क्लिक ॲंड बुक’ ही योजना आज सुरू झाली. तर, राज्यातील नागपूरसह मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि गोवा या शहरांमधील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT