Innovative initiative of Nagpur Police 
नागपूर

Video : घरात बोअर झाले तरी 'तुम्ही राहावे घरी... मनोरंजन तुमच्या दारी'

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या लढाईत सामान्य नागरिकांना प्रत्यक्षपणे सहभागी होता येत नसले तरी पोलिस आणि वैद्यकीय विभागातील कर्मचारी ती लढाई लढत आहेत. मात्र, तुम्हालाही या लढ्यात सहभागी व्हायचे असेल तर फक्‍त तुम्ही घरी रहा. तुम्ही घरात बोअर झाले असाल तर आम्ही तुमचे मनोरंजनसुद्धा करू, असा संदेश देत नागपूर पोलिसांनी एक अभिनव उपक्रम नागपूरकरांसाठी आखला आहे. यामध्ये हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी आणि देशभक्‍तीपर गितांचा नजराणा पोलिसांकडून नागरिकांसमोर आणला जात आहे. या उपक्रमाला शनिवारी व्हेरायटी चौकातून सुरुवात झाली. 

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्‍त रवींद्र कदम आणि वाहतूक शाखेचे उपायुक्‍त विक्रम साळी यांच्या हस्ते व्हेरायटी चौकात या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या उपक्रमाला "तुम्ही राहावे घरी... मनोरंजन तुमच्या दारी' असे नाव देण्यात आले. विदर्भ कलाकार संघटनेने या उपक्रमाला सहकार्य केले आहे.

पोलिसांनी एका व्हॅनवर संगीत वाद्य आणि संच तसेच गायकासाठी स्टेज उभारला होता. मोठमोठी स्पिकर्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत नागपूर पोलिसांकडून आवाहन, संदेश, सूचना प्रसारित करण्यात येत होत्या. त्यानंतर इंडियन आयडल फेम श्रीमती धनश्री बुरबुरे, राजेश बुरबुरे आणि वैभव बुरबुरे यांच्या अन्य काही गायकांनी आपल्या गितांचा नजराणा नागपूरवासीयांसाठी प्रस्तूत केला. 

ही म्युझिक व्हॅन शहरातील अनेक भागात आणि चौकात फिरली आणि नागपूरकरांना साद घालत मनोरंजनसुद्धा केले. या उपक्रमाचे नियोजन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त पराग पोटे, पोलिस निरीक्षक अजयकुमार मालविय, अतुल सबनिस, रोशन यादव, महेश चव्हाण, संदीप भोसले आणि मनोहर कोटनाके यांनी केले.

मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न 
हा उपक्रम इंफोटेन्मेंट असून पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पत्रकार बांधव, सफाई कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आखण्यात आला आहे. मनोरंजनासह नागरिकांपर्यंत महत्त्वाच्या सूचना, पोलिसांचे आवाहन आणि संदेश पोहोचविण्यासाठी उपयुक्‍त आहे. 
- विक्रम साळी, 
पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-India Relations: अमेरिकेला भारताची एवढी भीती का? ''चीनसारखी चूक आम्ही पुन्हा करणार नाही'', ट्रम्प यांच्या मंत्र्याचं मोठं विधान

पंढरपूरच्या चोरट्याने 6 जिल्ह्यातून चोरल्या 9 लाखांच्या दुचाकी; सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चोरट्याला पकडले, 4-5 हजारात उसने पैसे घेऊन द्यायचा दुचाकी

Pachod News : मध्यप्रदेशातील तरुण पोकलेन ऑपरेटरने झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले; रांजणगाव, पोलीस तपास सुरू

Manoj Ramchandra Patil Success Story : पहिल्यांदाच यु.पी.एस.सी.परीक्षेत दुष्काळी जालीहाळचा मनोज पाटील उत्तीर्ण

मानसिक विकलांग महिलेवर अतिप्रसंग, आरोपी सीटीटीव्हीत कैद; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT