ducks 
नागपूर

काय सांगता! बर्ड फ्लूची लागण बदकांपासून? चौकशी झाली सुरु; तब्बल ६६८ कोंबड्यांची विल्हेवाट

निलेश डोये

नागपूर :  जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या विषाणूची लागण बदकांपासून कोंबड्यांपर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील पक्षांच्या वाहतुकीवर बंदी असताना बर्ड फ्लूचा विषाणू नागपुरात आला कसा, हा मोठा प्रश्न असून याची चौकशी करण्यात येत आहे. 

कोरोनाचा दहशत कायम असताना पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूच्या विषाणूने थैमान घातले आहे. देशातील सहा राज्यांमध्ये विषाणूने धुमाकुळ घातला असून महाराष्ट्रातही त्याने पाय पसरले आहे. नागपूर जिल्ह्यात पक्षी कोंबड्या मरण पावल्याच्या चार घटना घडल्या. यातील तीन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर बुट्टीबोरी नजीकच्या वारंगा गावातील एकी पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच अहवाल पॉझिटिव्ह आला असताना विभागाकडून तो दडवून ठेवण्यात आला. कुणालाही याची माहिती दिली जात नव्हती. याबाबत गुप्तता ठेवण्याचे कारण काय असा प्रश्न  यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या फार्ममध्ये ९५ कोंबड्या होत्या. येथील ४५ कोंबड्या मरण पावल्या होत्या. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एक किलोमीटर परिसरातील ६६८ कोंबड्या मारून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या परिसरातूनच बदकांची वाहतूक झाली होती. त्यांच्यापासून कोंबड्यांना लागण झाल्याची प्राथमिक अंदाज विभागाला आहे.

धापेवाडात४० कोंबड्या मृत

धापेवाडा परिसरात ४० कोंबड्या मृत झाल्याची माहिती आहे. या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपालच्या  प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

बदकांच्या बाबतीत अद्याप माहिती नाही. परंतु याची चौकशी करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या. यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी माफसूच्या तज्ज्ञांची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
तापेश्वर वैद्य, 
सभापती, पशु व संवर्धन समिती, जि.प.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Panchayat Samiti New Dates: ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला मतदान

BBL सोडून Babar Azam मायदेशी परतला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच T20I मध्ये फ्लॉप झाला; मात्र पाकिस्तानला विजय मिळवण्यात यश

महत्त्वाची बातमी! फेसबुक-एक्सवर पोस्ट सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; राज्य सरकारकडून सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध लागू

SBI Recruitment 2026 : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये बंपर भरती! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली

SCROLL FOR NEXT