नागपूर

इंस्टाग्राम फ्रेंडचा शिक्षिकेवर अत्याचार; गर्भपात करण्यासाठी दबाव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः इंस्टाग्रामवरून (Instagram) फ्रेंडशिप झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्याने (Railway Officer) शिक्षिका असलेल्या मैत्रीणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मोबाइलने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Instagram Friend misbehaved with woman in Nagpur)

मोहम्मद इर्शाद इकबाल मिर्झा (३३, रा. ख्रिश्चन कॉलनी, मेकोसाबाग) असे आरोपी इंस्टाग्राम फ्रेंडचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय तरूणी रिया (बदललेले नाव) ही एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. तर आरोपी मोहम्मद ईरशाद मिर्झा हा रेल्वेत नोकरीला आहे. इंस्टाग्रामवरून २०१९ माध्यमातून त्यांच्यात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. इस्टांग्रामवर ते चॅटिंग करून आपसात बोलत होते.

एक वर्षे चॅटिंग केल्यानंतर ९ सप्टेंबर २०१९ रोजी इर्शादने रियाला लग्न करण्याचे आमिष दाखवले. दोघांची जवळिक वाढली. दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. रिया इर्शादच्या घरी राहायला आली. तीन चार महिने सुरळीत गेले. त्यानंतर त्यांचे घरगुती कारणावरून वाद होऊ लागले. त्यामुळे रियाने इर्शादचे घर सोडले आणि आपल्या माहेरी निघून गेली. दोघांच्याही कुटुंबियांनी मध्यस्थी करून त्यांचा समेट केला.

दरम्यान, रिया आणि इर्शाद हे आपसात भेटत असत. एकदा मिर्झाच्या घरी कुणीही नसताना त्याने तिला बोलविले. तिच्या कोल्ड्रींकमध्ये गुंगीची गोळी टाकली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचप्रमाणे तिची न्यूड फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

गर्भपात करण्यासाठी धमकी

इरशाद हा रियावर न्यूड फोटोची धमकी देऊन वारंवार बलात्कार करायला लागला. त्यातून ती गर्भवती झाली. पोटात बाळ असल्याबाबत तिने इर्शादला सांगितले. त्यावर इर्शाद तिच्यावर चिडला आणि तिला तिचा गर्भपात करण्यासाठी धमकी दिली, अशी तक्रार महिलेने पोलिसात दिली. या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(Instagram Friend misbehaved with woman in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT