Internal Clashes in Nagpur BJP Anil Sole and Sandip Joshi absent for Meeting  
नागपूर

भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढली ; पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीला अनिल सोले आणि संदीप जोशी अनुपस्थित  

राजेश चरपे

नागपूर ः महापौरांच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीला माजी आमदार अनिल सोले आणि माजी महापौर संदीप जोशी अनुपस्थित राहिल्याने पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपात अंतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसून येते. 

शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राजवाडा पॅलेस येथे बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत  सोले आणि जोशी दिसत नसल्याने एका आमदाराने ते बैठकीला आले का नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे बैठकीत चुळबूळ सुरू झाली. ते नाराज आहेत का, असेल तर त्यांना बैठकीला आणण्याची जबाबदारी कोणाची असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले.

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तो कशामुळे झाला याची अनेक कारणे दिली जात आहे. याचे प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने सिंहावलोकन करीत आहे. भाजप उमेदवाराला मतदान केल्यानंतर मतपत्रिकेवर चित्र, चिन्ह काढून अनेकांनी मुद्दामच मत अवैध केल्याचेही प्रकार निदर्शनास आले आहे. ही नाराजी कोणावर भाजप, उमेदवार की नेतृत्वावर अशीही विचारणा केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने बघत आहे. 

शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये उघडपणे कधीही नाराजी व्यक्त केली जात नव्हती. पक्षाचा निर्णय अंतिम मानला जात होता. याच करणामुळे राज्यात आणि केंद्रात सत्ता नसतानाही सुमारे साठ वर्षे पदवीधर निवडणुकीत भाजप कधीच पराभूत झाली नाही. यावेळी केंद्रात सत्ता होती. पाच वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे तगडे नेते नेते विदर्भात होते. ते प्रचारातसुद्धा सहभागी झाले होते. 

पुनर्बांधणी करावी लागणार

सर्व परिस्थिती अनकूल असताना जोशी यांचा पराभव भाजपला जास्तच छळत आहे. कार्यकर्ते हातबाहेर चालले असल्याने भाजपलाही आता पुनर्बांधणी करावी लागणार आहे. अन्यथा भाजप ‘काँग्रेस' व्हायला वेळ लागणार नाही, असे भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT