Investigate the Honeytrap audio clip
Investigate the Honeytrap audio clip 
नागपूर

हनिट्रॅप ऑडिओ क्‍लिपची चौकशी करा

राजेश चरपे

नागपूर : महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना "हनिट्रॅप'मध्ये अडकविण्याबाबतचे संभाषण असलेली कथित ऑडिओ क्‍लीपची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. 

विविध समाजमाध्यमांमध्ये सध्या एक दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली असून, त्यातून अनेक गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हनिट्रॅप करण्यासंदर्भातील गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन त्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचाही उल्लेख आहे.

ज्या न्यायव्यवस्थेकडे आपण अतिशय पवित्र नजरेने पाहतो, ती न्यायव्यवस्था मॅनेज करण्यासंदर्भातील उल्लेख आहे. अतिशय गंभीर उल्लेख यात असल्याने या ऑडिओ क्‍लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून त्यातील सत्य जनतेपुढे मांडण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

सध्या व्हायरल झालेल्या हनिट्रॅप क्‍लिप शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. यात भाजपच नव्हे तर इतरही काही नेत्यांची नावे घेण्यात आली आहे. क्‍लिपमध्ये साहील सय्यद नावाचा एक व्यक्ती दलालासोबत बोलत आहे. त्यात महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनिट्रॅपमध्ये कसे अडकवायचे याविषयी संभाषण करीत आहे.

विशेष म्हणजे साहीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी साहील सय्यद यांना सोबत घेऊन शहरातील एका प्रतिष्ठित इस्पितळावर धाड टाकली होती. ती साहीलवर उलटली. विशेष म्हणजे गंटावर यांचे कारनामे दयाशंकर तिवारी यांनी अलीकडेच महापालिकेच्या सभेत उजागर केले होते. महापौर जोशी यांना त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहे.

दुसरीकडे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व आरोप फेटाळून गंटावार यांना निलंबित करण्यास नकार दिला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कथित क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांच्यात सुरू असलेला संघर्षातून ही क्‍लिप व्हायरल केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT