irfan 
नागपूर

आमचं आयुष्य म्हणजे सुरेल लय, पत्नी सुतापा सिकदरची इरफानला ट्विटरवर भावपूर्ण शब्दसुमनांजली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इरफानला  प्रत्येक गोष्टीत लय जाणवायची, अगदी गोंधळात आणि कोलाहलातही. मीसुध्दा माझ्या बेसुर्‍या आवाजाने आणि बेताल पायांनी ती लय जपण्याचा प्रयत्न केला. एका अनपेक्षित वळणावर 'तो' (कॅन्सर) आगंतुक त्याच्या आयुष्यात आला आणि आयुष्य खूपच कर्कश्श झालं; तरी त्यानं ती लय हरवली नाही. मीसुद्धा त्या उदासिनतेमध्ये लय जपण्यात आता सरावले होते. आमचं आयुष्य म्हणजे अभिनयाची कार्यशाळाच झाली होती, अशी मन हेलावून टाकणारी शब्दवंदना सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान याची पत्नी सुतापा सिकदरने ट्विटर पोस्टद्वारे दिली.
मंजुल पब्लिशिंग हाऊसचे मुख्य संपादक चेतन कोळी यांनी 'दै. सकाळ'च्या वाचकांसाठी खास त्याचे मराठीमध्ये भाषांतर केले. ट्विटरवरील पोस्टमध्ये तिने आपल्या भावना मनमोकळेपणे मांडल्या. ती म्हणाली, इरफान गेला... तो पुन्हा कधीच परत येणार नाही. पण खरं सांगू, मी काहीच गमावलं नाहीये. त्याच्या जाण्याने मला खूप काही मिळालंय. तो गेलाय हे खरं, पण जाताना बरंच काही देऊन गेलाय आम्हाला. त्यानं आम्हाला खूप शिकवलं आयुष्यात. ती शिदोरी आता आयुष्यभर उपयोगी पडेल आम्हाला. आता वेळ आलीये त्यानं शिकवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणण्याची!
मी हे माझं वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख का बरं समजू? कारण आज लाखो लोकांची मनं दुःखानं व्याकूळ झाली आहेत. इरफान गेल्यामुळे कित्येकांना स्वतःच्या आयुष्यात पोकळी जाणवते आहे. माझ्यासोबत लाखोंचे डोळे पाणावले आहेत. जणू आपल्याच घरातला कोणीतरी गेलाय असं त्यांना वाटतंय. इरफानचे सर्व चाहते आता आमच्यासाठी आमचे कुटुंबीय आहेत. म्हणूनच तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. इरफान आमच्यासाठी आजही इथेच आहे. इरफानच्या शब्दांत सांगायचं तर, इट्स मॅजिकल! जीवनाचा एकांगी विचार त्यानं कधीच केला नाही.
या प्रवासात खूप मोठी माणसं भेटली मला. त्यांच्या नावाची यादी खूप लांबलचक होईल. पण हो, काहींचा उल्लेख नाही केला, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आमचे आँकॉलॉजिस्ट डॉ. निलेश रोहितगी (मॅक्स हॉस्पिटल, साकेत) यांनी सुरुवातीच्या त्या वादळी दिवसांत आम्हाला खूप धीर दिला. डॉ. डॅन क्रेल (यू.के.), डॉ. शिद्रवी (यू.के.) यांचे आभार मी कोणत्या शब्दांत मांडू! कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉ. शेवंती लिमये यांच्याविषयी मी काय सांगू! त्या माझ्यासाठी गडद अंधारातला जणू लामणदिवा होत्या. त्यांच्याशी आता हृदयाचे बंध जुळले आहेत, ते कायमचेच. हा प्रवास किती विलक्षण होता! एकाच वेळी तो सुंदरही होता आणि तीव्र वेदनादायीही; कधी रोमांचक होता तर बर्‍याचदा विव्हळ करणारा! ही अडीच वर्षे म्हणजे आमच्या आयुष्यातला मध्यांतर होता.
पण गंमत म्हणजे या मध्यांतरालाही स्वतःचा आरंभ, मध्य आणि परमोच्च बिंदू आहे. अर्थात, इरफानच या ऑर्केस्ट्राचा मुख्य सूत्रधार होता. पस्तीस वर्षांचं आमचं सहजीवन. पण खरं तर तो तथाकथित संसार कधीच नव्हता; ती पस्तीस वर्षांची एकतानता होती, एकरूपता होती.
आमची आयुष्यनौका पुढे जात होती. आमची दोन मुलं-बाबिल आणि अयान-ही नौका पुढे नेत होते. 'वहाँ नहीं, यहाँ से मुडो...' इरफानचा वेळोवेळी मिळणारा सल्ला त्या दोघांना दिशा देत होता. पण आयुष्य हे काही सिनेमासारखं नसतं. यात रिटेकही नसतात. माझी मुलं त्यांच्या वडलांच्या शिकवणीप्रमाणे पुढचा प्रवास करतील आणि येणार्‍या वादळांनाही समर्थपणे पेलतील, असं मला वाटतं.
मी मुलांना म्हणाले, तुमच्या वडिलांनी जे काही शिकवलंय त्याचं सार तुमच्या शब्दांत मांडा.
बाबिल म्हणाला, वडिलांचं एक वाक्य माझ्या नेहमीच लक्षात राहील. ते म्हणायचे, नियती क्षणाक्षणाला अनिश्‍चिततेचं नृत्य करत असते. त्या नृत्याला शरण जा आणि स्वतःवर विश्‍वास ठेव.
अयान म्हणाला, वडिलांनी सांगितलंय  मनावर ताबा मिळवायला शिक. मनाला तुझा ताबा कधीच घेऊ देऊ नकोस. या प्रवासात इरफान जिंकलाय आणि आता जिथे तो चिरनिद्रा घेतोय, तिथे त्याच्या आवडत्या रातराणीचं रोपटं लावताना आम्हाला अश्रू अनावर होणार आहेत. ही रातराणी फुलायला थोडा वेळ नक्कीच लागेल; पण तिच्या सुगंधाने इरफानच्या चाहत्यांची म्हणजेच माझ्या कुटुंबीयांची अंतरंगं येणार्‍या कित्येक वर्षांपर्यंत दरवळतील, हे नक्की!

सविस्तर वाचा - वैद्यकीय प्रमाणपत्र या झोनमध्ये मिळणार
डॉक्टरांचे रिपोर्ट जणू इरफानसाठीची स्क्रिप्ट
इरफानविषयी तक्रार करायचीच झाली तर मी इतकीच करेन की, त्यानं मला कधीच स्वस्थ बसू दिलं नाही. त्याला नेहमीच परिपूर्णतेचा ध्यास होता. त्यामुळे, मीसुद्धा माझ्या कोणत्याही कामानं कधीच संतुष्ट झाले नाही. परिपूर्णतेचा इरफानचा अट्टहास माझाही ध्यास झाला. डॉक्टर्सनी माझ्या हाती दिलेले रिपोर्ट्स म्हणजे जणू इरफानसाठी लिहिलेलं स्क्रिप्ट असायचं. इरफाननं माझ्यात मुरवलेल्या परिपूर्णत्वाच्या ध्यासामुळे मी या स्क्रिप्टमधले बारकावे एव्हाना टिपू लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT