शिक्षण सभापती भारती पाटील यांनी चौकशी टाळत फक्त बिलाच्या पावत्या सादर करण्याचे सूचना केल्या असून काहींच्या इशाऱ्यावरूनच शिक्षण संघटनाही यात उडी घेतल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 
नागपूर

गणवेश पुरवठ्याचे काम विशिष्ट व्यक्तींना? मोठी अनियमितता समोर येण्याची शक्यता

निलेश डोये

नागपूर : समग्र अभियानांतर्गत जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गणवेश निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश खरेदी करण्यात आला असता तरी विशिष्ट पुरवठादाराकडून घेण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. याची सखोल चौकशी झाल्यास मोठी अनियमितता समोर येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिक्षण सभापती भारती पाटील यांनी चौकशी टाळत फक्त बिलाच्या पावत्या सादर करण्याचे सूचना केल्या असून काहींच्या इशाऱ्यावरूनच शिक्षण संघटनाही यात उडी घेतल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

कोरोनामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभिमानातून १ गणवेश देण्यात आला. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेला १.९२ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. हा निधी शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समितीकडे वळताही करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. 

शिक्षण समितीने सर्व शाळांसाठी एकसमान गणवेश ठेवण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे गणवेशावर जि.प.चा लोगो लावण्याच्याही सूचना केल्या. गणवेशाचा विषय सुरवातीपासूनच वादात राहिला. अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांना शिक्षण समितीने केलेल्या सूचनांकडे दूर्लक्ष करून स्वमर्जीने गणवेश खरेदी केला.

विशेष म्हणजे शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. सदस्यांच्या तक्रारीनंतर पाटील यांची चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु त्यांनी चौकशी टाळत ज्या शाळांनी गणवेश खरेदी केले, त्या शाळांकडून गणवेशाच्या बिलाच्या पावत्या व गणवेशाचा फोटो सादर करण्याच्या सूचना शिक्षण सभापती पाटील यांनी बीईओंना दिल्या. सभापती पाटील यांनी कुणालाही गणवेश पुरवठ्याचे कंत्राट दिले नसल्याचे सांगतले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणवेश काही मोजक्याच व्यक्तींकडून खरेदी करण्यात आल्या. त्यामुळे चौकशी झाल्यास सर्व पितळ उघड पडण्याची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे चौकशी टाळण्यात आल्याची चर्चा आहे.

पदाधिकाऱ्याच्या बंगल्यावर बैठक

गणवेशाच्या विषयावर एका पदाधिकाऱ्याच्या बंगल्यावर बैठक झाली. यावेळी तीन सभापतीसह दोन पुरवठादार व काही सदस्य उपस्थित होते. चर्चेतील नेमकी माहिती कळू शकली नाही तरी गणवेशाच्या विषयावर पडदा टाकण्यावर भर देण्यात आल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : पुण्यात बोरवेलमुळे मेट्रो बोगद्याला भगदाड, मेट्रोचे काम सुरू असलेल्या बोगद्यात पाण्याची गळती

SCROLL FOR NEXT