नरखेड : सदया दुसरीकडे पळविण्यात आलेली नरखेड केंद्रावरील येथील रूग्णवाहिका. 
नागपूर

तब्बल पाच तास होते कोविड रुग्ण ताटकळत, काय आहे भानगड...

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि.नागपूर ): एकतर ग्रामीण भाग. त्यातही कोरोनाचे संकट. समस्यांची मोठी जंत्रीच असताना कोरोनाशी निपटण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. अशाप्रसंगी लॉकडाउन शिथिल होताच पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना चक्‍क कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना उपचारासाठी शहरात नेईस्तोवर मोठ हाल होत आहेत. त्यातही ऐनवेळी एका मोठया समस्येची भर पडली. त्यामुळे कोविड रूग्णांचे हाल होत असताना उघडया डोळयांनी पाहावे लागत असल्याचे प्रसंग नेहमीच निदर्शनास येत आहेत.

अधिक वाचा :तणनाशकाने फस्त केले भूईमूग पिक! काय झाले असे...

पॉईंट विसरले काय?
गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात दररोज विविध भागात कोविडचे रुग्ण मिळणे सुरू झाले आहे.
कोविड रुग्णांची ने-आण करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सकांनी नरखेड तालुक्‍यात ग्रामीण रुग्णालय पॉईंटवर रुग्णवाहिका दिली होती. जिल्हा रुग्णवाहिका समन्वयकांनी17 जूनला त्या रुग्णवाहिकेचा पॉईंट ग्रामीण रुग्णालय नरखेड बदलवून काटोल येथील पारडसिंगा कोविड केअर सेंटर केला. तेव्हापासून नरखेड तालुक्‍यात रुग्णवाहिका नाही. नरखेड तालुक्‍यातसुद्धा कोविड केअर सेंटर सुरू झाले असून बाधित रुग्ण तिथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा :लॉकडाउनचा होणार नाही शेतीकामावर परिणाम, काय आहे कारण...

फोन केला असता प्रतिसादच नाही !
शनिवारी(ता.25) सावरगाव व नरखेड कोविड केअर सेंटर येथील बाधित रुग्णाला नागपूरला उपचारार्थ पाठविण्याकरिता रुग्णवाहिकेची गरज होती. परंतू मागणी करूनही तब्बल पाच सहा तास रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर कोंढाळी येथून रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेअभावी रुग्णासह कुटुंबीय व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. काल शुक्रवारी (ता.24 )संशयित रुग्णाचे सॅम्पल नागपूर येथे पोहचविण्याकरिता कोणतीच गाडी उपलब्ध नव्हती. शेवटी रात्रीच्या सुमारास मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 102 रूग्णवाहिकेने सॅम्पल नागपूरला पोहचविण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातूरकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अधिक वाचा : ते तुकाराम मुंढे आहेत, डोळयात धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार

महसूल विभागाचा संबंध नाही !
रुग्णवाहिकेचे नियोजन आरोग्य विभाग जिल्हा समन्वयकांकडून करण्यात येते. त्यांना प्रस्ताव दिला आहे. परंतू रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली. रुग्णवाहिकेशी महसूल विभागाचा संबंध नाही.
श्रीकांत उंबरकर
उपविभागीय अधिकारी  

                                                                     संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT