Jagdish Khare saved the life of the woman 
नागपूर

देव तारी त्याला कोण मारी! ‘ति’च्या मदतीला धावून आला ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’धारी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कौटुंबिक कारणामुळे ती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. आता जीवन संपवून कायमची या कटकटीतून मुक्ती मिळावी म्हणून तिने शुक्रवारी तलावात उडी घेतली. परंतु, ‘जगदीश’रूपी देवाला तिने तलावात उडी घेतल्याचे दिसले. त्याने क्षणाचाही विलंब न करात तिला पाण्यातून बाहेर काढले.

नेहमीप्रमाणे जगदीश खरे हे शुक्रवारी तलावाच्या बाजूला बसले होते. यावेळी अचानक एक महिला तलावाच्या काठावर उभी झाली. ती आत्महत्या करणार असल्याचे जगदीश खरे यांच्‍या लक्षात आले. काहीही करण्याआधी तिने तलावात उडी घेतली. खरे यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी घेतली आणि तिला बाहेर काढले.

एकाएक घडलेल्या या घटनेमुळे तलावाच्या बाजूला बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती गणेशपेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तिची शांततेने विचारपूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला प्रचंड तणावात आणि घाबरलेली असल्याने तिच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. 

तिला वाचविणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही तर जगदीश खरे होय. ज्यांनी आजवर हजारोंवर लोकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. तितकेच आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह पाण्यबाहेर काढले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून जगदीश खरे आणि पत्नी जयश्री हे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’नेही नोंद घेतली आहे. नागपुरातील लाइफ सेव्हर म्हणून त्यांची ओळख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT