Jalna Riot News esakal
नागपूर

Jalna News : अचानक गारांसारखा दगडांचा वर्षाव झाला,जालन्यातील जखमी पोलिसांच्या प्रतिक्रिया

आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी मीना घनगाव यांनी सांगितले की, अचानक आमच्यावर दगडांचा वर्षाव सुरू झाला.

सकाळ वृत्तसेवा

जालना - आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचाराची गरज आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे असल्याने अधिकाऱ्यांसोबत आम्ही बंदोबस्तावर गेलो होतो. मात्र त्याठिकाणी ग्रामस्थांचा गैरसमज झाला.

एकच गोंधळ होऊन रेटारेटी झाली. त्यात आजूबाजूने गारा पडाव्यात तसा दगडांचा वर्षाव सुरू झाला. आमच्या डोक्याला दगड लागले. रक्तबंबाळ अवस्थेत आम्हाला दवाखान्यात दाखल केल्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

या घटनेत पोलिसांवरही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यात जखमी झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी महिलांवर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी मीना घनगाव यांनी सांगितले की, अचानक आमच्यावर दगडांचा वर्षाव सुरू झाला. गारा पडतात तसे दगड आमच्या डोक्यात लागले. त्यामुळे मी रक्तबंबाळ झाले.

गैरसमजातून दगडफेक

पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांनी सांगितले की, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याचे अहवाल होते. त्यानुसार त्यांनी उपचार घ्यावा म्हणून पोलिस अधिकारी त्या ठिकाणी गेले होते. त्यांच्यासोबत आम्ही देखील होतो. चर्चा सुरू असताना काही ग्रामस्थांचा गैरसमज झाला की, आम्ही मनोज जरांगे यांना घेऊन जात आहोत. त्यातून काहींनी दगडफेक सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

Nashik Flood: नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम; बाजारात पाणी, त्र्यंबकेश्वरात वीजपुरवठा ठप्प

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

BSF Jawan: सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

पंढरीच्या वारीचा भक्तिरस अनुभवायचा? 'देवा विठ्ठला' भक्तिगीतातून विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा सुरेल संगम

SCROLL FOR NEXT