Jeshtha Gauri Pujan 2022 inflation flowers market nagpur  esakal
नागपूर

Jeshtha Gauri Pujan 2022 : ज्‍येष्ठागौरीच्या हारांना महागाईचा सुगंध

१५०० ते सहा हजार रुपयांपर्यंत पूजेच्‍या हारांच्‍या जोडीचे दर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणेशोत्सवापाठोपाठ महालक्ष्मी असे सण लागून असल्यामुळे नेताजी मार्केटमध्ये फुलांच्या बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्येष्ठा गौरीच्या स्वागतासाठी संपूर्ण फूल बाजारपेठ सज्ज झाली आहे. महालक्ष्मीच्या पूजेमध्ये वेगवेगळ्या फुलांची सजावट, आरास आणि हार यांचा उपयोग होत असतो. त्यामुळे वैविध्यपूर्ण फुलांनी बाजार फुललेला आहे. जैष्ठागौरी पूजेच्या हाराच्या जोडीचे दर १५०० ते ६००० रुपयापर्यंत पोचले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर निर्बंध होते. यंदा ते पुर्णपणे मागे घेतल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

नेताजी बाजारात राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद या राज्यातील शहरासह आंध्र प्रदेश, बेंगळुरू आणि कोलकाता येथून फुलांची आवक होते. यामध्ये पुण्याहून डच गुलाब, बेंगळुरूहून आर्चिड तर झेंडू आणि शेवंती सातारा, सांगली येथून येतो. झेंडू आणि शेवंतीची आवक वाढलेली आहे. तर जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातून येणारा जरबेरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब, फोरालिया, मोगरा , पिटोनिया, जास्वंद, चाफा, मोगरा, गौरी चाफा यांना मागणी आहे.

साधा देशी गुलाब ३०० रुपये, शिर्डी गुलाब (पाकळ्या न गळणारा आणि दांडी असलेला) ४०० रुपये आणि डच गुलाब २० रुपयाला एक नग या किंमतीला विकला जात आहे. निशिगंधाची एक स्टिक दहा तर ऑर्चिड एक नग ७० रुपयांना उपलब्ध आहे. शेवंती २०० ते ४०० रुपये प्रतिकिलो आहे. झेंडू ९० ते ११० रुपये प्रतिकिलो दराने बाजारात विक्रीला आहे.

इंधनदरवाढ, अतिप्रमाणात झालेला पाऊस. यामुळे फुलांच्या दरात दहा टक्के वाढ झालेली आहे. आवक कमी आणि फुलांची मागणी यात किंचित तफावत असली तर भाव वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांना ही दर वाढ दिलासा देणारी आहे.

- जयंत रणनवरे, फूल विक्रेते

पुढच्या तीन दिवसांत दरवाढ!

महालक्ष्मी पूजनासाठी दोन मोठे आणि दोन लहान हार, केवडा, दोन वेणी, कमळ असा संपूर्ण सेट बाजारात उपलब्ध आहे. फुलाच्या निवडीनुसार सेटचा दर वेगवेगळा आहे. निशिगंधा २ हजार रुपये, डच गुलाब चार हजार रुपये, गुलाब पाकळ्यांचा सेट ४ हजार ५०० रुपये, ऑर्चिड सहा हजार रुपयांना विक्री सुरू आहे. पुढील तीन दिवसांत यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT