धापेवाडा : वडील प्रभाकर यांच्यासोबत जयश्री ठाकरे.  
नागपूर

आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू म्हणते खेळावर "फोकस' करण्यासाठी नोकरी हवीच

नरेंद्र चोरे

नागपूर : फारशा सोयीसुविधा नसलेल्या धापेवाड्यासारख्या छोट्याशा गावातून आलेल्या एका मुलीने विपरीत परिस्थितीत संघर्ष करून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. दक्षिण आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. मात्र, या चमकदार कामगिरीनंतरही तिला नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे. ही कहाणी आहे शेतकऱ्याची मुलगी व आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू जयश्री ठाकरेची.


आपल्याला मोठी खेळाडू बनायचेच, व्हॉलीबॉलमधील उंची गाठायची या एकमेव उद्देशाने कोवळ्या वयात मैदानावर उतरलेल्या जयश्रीने शहराकडे धाव न घेता आपल्याच गावात राहून प्रगतीचे शिखर गाठले. धापेवाड्यात खेळाडूंसाठी फारशा सोयीसुविधा नाहीत. केवळ कोलबास्वामी महाविद्यालयाचे एक छोटेसे मैदान आहे. मात्र, जिद्द व मेहनतीच्या बळावर जयश्रीने यशाच्या एकेक पायऱ्या चढत थेट आंतरराष्ट्रीयस्तरावर मजल मारत आपल्या गावाचे व परिवाराचे नाव रोशन केले. मंगेश धोटे व मनोज धकाते यांच्या तालमीत घडलेल्या जयश्रीचे वडील (प्रभाकर ठाकरे) साधारण शेतकरी. आई हेमलता गृहिणी. तिघा भावांमिळून जेमतेम सहा ते सात एकर कोरडवाहू शेती. संयुक्त परिवार असल्याने खाणारे जीवही भरपूर. परंतु, जयश्रीने परिस्थितीचे कधीच भांडवल केले नाही. आहे त्या परिस्थितीत खेळात प्राण ओतून व्हॉलीबॉलमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

24 वर्षीय जयश्रीने बारा वर्षांच्या करिअरमध्ये विविध वयोगटांतील 22 राज्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. अखिल भारतीय सिनिअर, शालेय, युवा, फेडरेशन चषकसह जवळपास दहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले. या कामगिरीच्या बळावर तिला 2014 मध्ये काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले, ज्यात उंचपुऱ्या जयश्रीचेही उल्लेखनीय योगदान ठरले. सुवर्णपदकविजेत्या संघाची सदस्य या नात्याने तिला सरकारी नोकरीची अपेक्षा होती. तिने नोकरीसाठी रेल्वेसह जागोजागी हातपायही मारले. पण, इतर खेळाडूंप्रमाणे तिदेखील "जॉब'पासून वंचित राहिली.

जयश्रीच्या मते, आंतरराष्ट्रीय खेळाडूला करिअरवर फोकस करण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन अतिशय आवश्‍यक आहे. नोकरी असेल तरच तो किंवा ती खेळाडू चिंतामुक्त राहून शंभर टक्के "परफॉर्मन्स' देऊ शकते. प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने अखेर जयश्रीला एका खासगी शाळेत पार्टटाइम नोकरी करावी लागत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये अपघातात आठ टाके लागल्याने ती नोकरीही गेली. जयश्री लॉकडाउनमुळे सध्या घरीच आहे. दोन अडीच महिन्यांपासून सरावही बंदच आहे. कोरडवाहू शेती असल्याने ठाकरे परिवाराला यावर्षी समाधानकारक पीक झाले नाही. पण नाराजीही नाही. कुणापुढे हात पसरविण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगणे यावरच त्यांचा सदैव भर असतो.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या भरवशावर एखादी नोकरी मिळून करिअरमध्ये "सेटल' होणे, ही एवढीच एक अपेक्षा महिला खेळाडू म्हणून मी केली होती. दुर्दैवाने आतापर्यंत तरी त्यात मला यश आले नाही. नोकरी मिळाल्यास खेळाडू चिंतामुक्त होऊन आणखी जोमाने खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो.

जयश्री ठाकरे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

Whatsapp Threaded Reply : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका भन्नाट फीचरची एन्ट्री! हे नेमकं कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरण विसर्ग सध्या १४ हजार ५४७ क्यूसेक; २० हजार क्युसेक होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT