हिंगणाः शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलांची पूजा करताना जि.प.च्या महिला बाल कल्याण सभापती उज्वलाताई बोढारे , त्यांचे पती बापूसाहेब बोढारे व कुटुंबीय.
हिंगणाः शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलांची पूजा करताना जि.प.च्या महिला बाल कल्याण सभापती उज्वलाताई बोढारे , त्यांचे पती बापूसाहेब बोढारे व कुटुंबीय.  
नागपूर

फक्त वचन द्या मालक, मी कत्तलखान्यात मरणार नाही...

विजयकुमार राऊत

नागपूर ग्रामीणः  यंदा ना बॅंडबाजा, ना बैलांना तोरणात नेण्याची घाई, ना गर्दी, ना एकापेक्षा एक झडत्या सादर करण्याची स्पर्धा...औंदाचा पोळा कसा मुकामुकाच...तरीही शेतीचं वैभव, शेतकऱ्यांच दैवत असलेल्या बैलांना दिलेलं जेवणाचं आमंत्रण शेतकरी कसं सुनं जाऊ देणार? ज्या बैलांच्या भरवशावर शेतकऱ्यांचा प्रपंच चालतो, त्या बैलांना नटवून थटवून नाही तोरणात तर किमान घरीच पूजा करून बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास शेतकरी राजा विसरला नाही. पुरणपोळीचा नैवद्य भरविताना यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी आपल्याच घरी झडत्या म्हणण्याची कोरोनाकाळातही संधी सोडली नाही. कुणी ऑनलाइन झडत्या म्हणण्याची हौस भागवून घेतली, तर कुणी शेताच्या बांधावर जाऊन बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले.  बैलांनी पोळा सणाच्या पार्श्‍वभूमीवर पडत्या काळात  कत्तलखान्यात न पाठविण्याचे  वचन घेतले.


 नाही दिली पुरणाची पोळी
तरी राग मनात धरणार नाही
फक्त वचन द्या मालक मला
मी कत्तलखान्यात मरणार नाही...

 
कोरोनाने वाजवला पोळ्याचा बॅंडबाजा
रामटेकः काही होशांनी ‘झडत्यां’ची हौस तर ऑॅनलाइन भागवून घेतली. यावर्षी "मारबत"द्वारे रोगराई, भ्रष्टाचार, आतंकवाद घेऊन जा’ म्हणण्याचीही सोय या कोरोनाने ठेवली नाही. नाहीतर आबालवृद्ध या मारबत मिरवणूकीत सामिल होऊन मोठमोठ्याने ‘रोगराई घेऊन जा गे मारबत, भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन जा गे मारबत’ अशा घोषणांनी सगळे शहर दणाणून सोडतात .यावेळी सारे मौन मौन.तरीही बळीराजाने बैलांना सजवून घरीच पोळा साजरा केला.

हिंगणा तालुक्यात पोळ्याच्या पंरपरेला ‘ब्रेक’
हिंगणा :  बैलाच्या पोळ्याला कोरोनाचा ब्रेक मिळाल्याने मंदिराची चावडी सुनसान दिसून आली. तालुक्यात कान्होलीबारा, अडेगाव, देवळी सांवगी, मोहगाव,  गुमगाव, वानाडोंगरी या मोठ्या गावातील पोळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी बघायला मिळते. हीच गर्दी कोरोनासाठी घातक असल्याचे लक्षात घेवून प्रशासनाने खबरदारी घेऊन पोळ्यावर बंदी आणली. पण तरीही शेतकऱ्यांत उत्साह दिसून आला.

शेतीच्या बांधावरच पोळा उत्सव
सावनेरः यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरीच पोळा उत्सव साजरा करण्याचे आवाहन  प्रशासनाने केल्याने शहरात व्यवसायाने वकील असलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या परिवारासह चक्क शेतातच गोडधोड पदार्थ तयार केले . शेतात बैलासोबत राबणाऱ्या मजुरांचा सन्मान करून पोळा उत्सव साजरा केला.

कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाइन पोळा
कामठीः कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात बैल पोळा भरविला जातो. परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी बाजार समितीमध्ये भरणारा बैल पोळा रद्द केला. शेतकऱ्यांचा उत्साहाचा पोळा हा सण साजरा करण्यात यावा, या उद्देशाने बाजार समितीच्या वतीने ऑनलाइन बैल पोळा सण साजरा करण्याचे आवाहन सभापती हुकुमचंद आामधरे यांनी केले. त्यानिमित्ताने ऑनलाईन उत्कृष्ठ बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोडीस आकर्षकरित्या सजवून पूजा करून कुटुंबीयांसोबत फोटो काढून पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार रुपात पंप (फवारा), द्वितीय मोबाईल, तृतीय कुकर, चौथा तळपत्री, पाचवा भिंतीवरील घड्याळाच्या रुपात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सभापती हुकुमचंद आामधरे यांनी सांगितले. या उपक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT