red light area agitation e sakal
नागपूर

'देहव्यापार बंद केला तर सरकार नोकरी देईल का?' गंगा जमुनामध्ये आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरातील इतवारी भागात असणाऱ्या गंगा जमुना वस्ती (nagpur red light area) पोलिसांनी सील केली आहे. त्याविरोधात विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची कन्या ज्वाला धोटे (ncp leader jwala dhote) यांनी आंदोलन केले. पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकेट्स तोडून त्यांनी कारवाईचा (nagpur ganga jamuna agitation) निषेध नोंदविला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वारांगणा आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.

गंगा जमुना वस्तीतील बॅरिकेट्स हटविताना आंदोलक

गेल्या ११ ऑगस्टला पोलिसांनी गंगा जमुना वस्ती चारही बाजून बॅरिकेटींग लावून परीसर सील केला होता. यामध्ये देहव्यापार करण्यास मनाई केली होती. तसेच बाहेरील ग्राहकांना येण्यास देखील बंदी घातली होती. याठिकाणी अल्पवयीन मुलींकडून बेकायदेशीररित्या देहव्यापार करवून घेतला जातो. तसेच गुन्हेगार अंमली पदार्थांचा व्यापार चालवितात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून पोलिस विभागाने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

देहव्यापार बंद केला तर सरकार नोकरी देणार का?

दरम्यान, विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला जांबुवंतरावा धोटे यांनी वारांगणा यांना सोबत घेऊन आंदोलन केले. पोलिसांनी ही वस्ती सील करून येथील जागा धनदांडग्यांच्या घशात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. पण, या वस्तीतील घरे ही येथील वारांगणाच्या मालकीचे आहेत. त्यांना दुसरीकडे हाकलता येणार नाही. तसेच येथील देहव्यापार बंद करणार असेल तर शासन त्यांना नोकरी देणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच बॅरिकेटींग तोडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला.

आता आम्ही कुठे जायचे?

पोलिसांची कारवाई चुकीची आहे. आम्ही अनेक वर्षांपासून या वस्तीत राहून आमचे जीवन जगत आहोत. आमच्या मुला-बाळांना शिकविण्यासाठी लागणारा खर्च या व्यवसायातून निघतो. आमच्या पुढील पिढीने हा व्यवसाय करू नये, असेही आम्हाला वाटते. पण, सध्या आम्हाला तरी जगू द्या. आम्ही आहे तिथेच मरू. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहोत. आता आम्ही कुठे जायचे? असा प्रश्न वारांगणांनी उपस्थित केला.

आंदोलकांवर कारवाई करण्याचा इशारा -

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे नागपूर झोन तीनचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT