captain deepak sathe 
नागपूर

कॅप्टन दिपक साठे, 84 वर्षांच्या आईला देणार होते सरप्राईज्

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - केरळमधील कोझिकोड विमानतळावर झालेल्या दुर्घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेस विमानातील 17 जणांसह पायलट कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. कॅप्टन दीपक साठे आज (शनिवार 8 ऑगस्ट) त्यांच्या आईचा 84 वा वाढदिवस साजरा करणार होते. यासाठी थेट नागपूर इथं जाऊन आईला सरप्राइज देण्याची त्यांची इच्छा होती. मात्री त्याआधीच झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

दीपक साठे यांचे नातेवाइक डॉक्टर यशोधन साठे यांनी सांगितलं की, कॅप्टन साठे यांच्या आईचा शनिवारी वाढदिवस आहे. त्यांनी मार्च महिन्यात शेवटचं आई वडिलांची भेट घेतली होती. फोनवरून दीपक साठे नेहमीच त्यांच्या संपर्कात असायचे. दुर्घटनेच्या आधी दोन दिवस त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं होतं. तसंच काही नातेवाइकांना सांगितलं होतं की जर प्रवासाची सोय झाली तर आईच्या वाढदिवसाला नागपूरला पोहचून तिला सरप्राइज देईन. 

कॅप्टन दीपक साठे हे पत्नीसह मुंबईत राहत होते. तर त्यांची आई नीला साठे आणि लष्करातून निवृत्त झालेले वडील कर्नल वसंत साठे हे नागपूरला राहतात. कोरोनाच्या संकटात कॅप्टन साठे यांनी आई वडिलांना घरातून बाहेर पडू नका असं सांगितलं होतं. कॅप्टन साठेंची आई नीला म्हणाल्या की, आम्ही घरातून बाहेर पडू नये असं त्याला वाटायचं. आम्हाला काही झालं तर त्याला जास्त दु:ख झालं असतं आणि आता ही दुर्घटना झाली.

दीपक साठेंच्या आईने सांगितलं की, ते खेळ असो किंवा अभ्यास सगळ्यात पुढे असायचे. टेबल टेनिस आणि स्क्वॅशमध्ये उत्कृष्ट खेळायचा. घोडेसवारीसुद्धा चांगली करायचा. माझ्या मुलाला स्वॉर्ड ऑफ ऑनरसुद्धा मिळाला पण या सन्मानाचे किंवा पुरस्कारांची त्याने कधीच चर्चा केली नाही. 

हवाई दलाचे सर्व आठ पुरस्कार मिळवणारे दीपक साठे हे पहिले महाराष्ट्रीयन होते. लोकांची मदत करणं आणि त्यासाठी काहीही कऱण्याची त्यांची तयारी असायची असं त्यांच्या आईने म्हटलं. गुजरातमध्ये आलेल्या पुरावेळी कॅप्टन दीपक साठेंनी सैनिकांच्या मुलांना खांद्यावर उचलून वाचवलं होतं. दीपक साठेंचा मोठा भाऊ विकास साठे हे सुद्धा लष्करात लेफ्टनंट होते. त्यांचाही अपघातात मृत्यू झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT