Nagpur Nrime News
Nagpur Nrime News sakal
नागपूर

Nagpur Nrime News : अपहरण करून केला मुलीवर अत्याचार ; जीवे मारण्याचा होता प्लॅन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगरात दहा वर्षीय मुलीचे पैसे देण्याच्या बहाण्याने दोघांनी बुधवारी दोघांनी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अपहरण केले होते. दरम्यान भांडेप्लॉट चौकात दोघेही मुलीसह आढळले. पोलिसांनी त्यांना अटक केली असता, त्याने मुलीचे अपहरण करीत, तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुरेंद्र रामकृष्ण पराये (वय ३६, रा. अयोध्यानगर) आणि मनोहर रामराव मालखेडे (वय ५३,रा.सावित्रीनगर झोपडपट्टी,अजनी),असे आरोपीचे नाव असून तो मनोविकृत आहे. सक्करदरा परिसरात तो एका ठेल्यावर आचाऱ्याचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलाचे फुटपाथवर कपड्याचे दुकान असून बुधवारी (ता.२७) दुपारी मुलगी व तिचा १२ वर्षीय मोठा भाऊ दुकानावर होते. यावेळी सुरेंद्र तिथे आला. त्याने कापड खरेदी केले.

पैसे मित्राजवळ आहे, चल तुला पैसे देतो, असे म्हणत तो दहा वर्षीय मुलीला काही अंतरापर्यंत सोबत घेऊन गेला. तेथे त्याचा साथीदार मोटारसायकलवर होता. त्याने बळजबरीने मुलीला मोटारसायकल बसविले. तिचे तोंड दाबले. दोघेही तिला घेऊन पारडीतील एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान दोघेही सुरेंद्रच्या घरी मुलीला घेऊन गेले. मात्र, नातेवाईकांनी त्याला हाकलून लावल्याने ते दोघेही तिला मारण्याच्या विचाराने भांडेप्लॉट चौकात आले.

दरम्यान पोलिस नियंत्रण कक्ष वायरलेस ड्युटीवर असलेल चंदु ठाकरे यांनी या मुलीचे वर्णन ऐकले होते. कर्तव्य बजावून सायंकाळी आठ वाजता दरम्यान घरी परत जात असताना त्यांना भांडे प्लॉट परिसरात त्याच वर्णनाची मुलगी रडताना आढळली. त्याने ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. तसेच, सक्करदरा पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. दोघांनाही विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

SCROLL FOR NEXT