Knife attack Knife attack
नागपूर

लग्नास नकार दिल्याने चिडली प्रेयसी; प्रियकरावरच केला चाकू हल्ला

घटस्फोटित मैत्रिणी पूजा गोस्वामीसोबत अक्षयचे भांडण झाले

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ‘माझ्यासोबत लग्न का करत नाही’ या कारणावरून युवकाचे मैत्रिणीसोबत भांडण झाले. यामुळे चिडलेल्या मैत्रिणीने युवकावर चाकूने हल्ला (Knife attack) करून जखमी केले. जीव वाचविण्यासाठी युवक अर्धा किलोमीटर धावत गेला. अक्षय कृष्णाजी ढोके (वय २७) असे जखमी युवकाचे नाव आहे. तर पूजा गोस्वामी (३०) असे अटकेतील आरोपी महिलेचे (girlfriend arrested) नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा (गुरुप्रसादनगर, प्लॉट नंबर ४२, दत्तवाडी) येथे तीन वर्षांपासून किरायाने राहतो. त्याच्यासोबत मित्र तुषार भोयर व सतीश डेकाटे (सिर्सी, ता. उमरेड) हेही राहतात. तो वाडीला खासगी कंपनीत काम करतो. मकरसंक्रांतीनिमित्त तुषार व सचिन गावाला गेले होते. अक्षय एकटाच रूमवर होता. सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घटस्फोटित मैत्रिणी पूजा गोस्वामीसोबत अक्षयचे भांडण झाले.

पूजासोबत अक्षयची दोन ते तीन वर्षांपासून मैत्री आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पूजाने पतीला घटस्फोट दिला. परंतु, काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडू लागले होते. अक्षय रूमवर एकटाच असल्याची माहिती पूजाला मिळाली. यामुळे ती रूमवर पोहोचली.

यावेळी लग्नावरून दोघांत भांडण झाले. अक्षयने लग्न करण्यास नकार (Marriage was refused) दिल्याने पूजाने चाकूने अक्षयच्या हातावर, मानेवर, पाठीवर, गालावर सपासप वार (Knife attack) केले. यामुळे अक्षय रूमवरच रक्तबंबाळ झाला होता. पूजाच्या तावडीतून सुटत अक्षय जीव वाचविण्यासाठी अर्धा किलोमीटर दत्तवाडी चौकापर्यंत धावत गेला. चौकातील नागरिकांनी अक्षयला वाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अक्षयवर डॉक्टर उपचार करीत असून गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

पूजाने दिली होती धमकी

पूजाने अक्षयच्या आईला एकदा फोन केला होता. यावेळी तिने ‘अक्षय माझ्यासोबत लग्न करणार नसेल तर मी त्याला सोडणार नाही, त्याचा जीव घेईन’ असे सांगितले होते. यातून तिने लग्नाचा तगादा लावून अक्षयवर चाकू हल्ला केला. वाडी पोलिसांनी पूजा गोस्वामी (girlfriend arrested) हिला अटक केली. मंगळवारी घटनेचा सखोल तपास करीत वाडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT