Knife attack on wifes boss out of suspicion 
नागपूर

संशयावरून पत्नीच्या बॉसवर चाकूहल्ला; प्रेयसीचा काढले अश्लील फोटो

अनिल कांबळे

नागपूर : खासगी नोकरी करणाऱ्या पत्नीचे कार्यालयात बॉसबरोबर अनैतिक संबंध आहेत, या संशयातून पतीने बॉसवर चाकूहल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गिट्टीखद्दानमधील दुर्गा चौक येथे घडली. अमलकुमार भुनेश्वर आर्या (रा. येरखेडा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अंकुश भगत (रा. झिंगाबाई टाकळी) याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

दुर्गा चौकातील मेट्रो प्लाझा बिल्डिंग येथे आर्या यांच्या मालकीचे रसाई सिक्युरिटी गार्डचे कार्यालयाचे आहे. येथे भगत याची पत्नी कॉम्प्युटर ऑपरेटर पदावर काम करते. आर्या यांच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अंकुश भगत याला आला.

शनिवारी सकाळी भगत हा कार्यालयात गेला. त्याचे चाकूने आर्या यांच्यावर वार केला. त्यानंतर बत्त्याने त्यांच्या डोक्यावर वार केला. आर्या जखमी झाले. यानंतर अंकुश पसार झाला. आर्या यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून भगत याचा शोध सुरू केला आहे.

प्रेयसीचा काढले अश्लील फोटो

प्रेयसीने प्रियकरासोबत दुरावा ठेवत दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबंध ठेवल्यामुळे चिडलेल्‍या पहिल्या प्रियकराने तरुणीचे अश्‍लील फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना सदर भागात उघडकीस आली. २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

राहुल सुखदेव पालीवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पीडित तरुणी व राहुलचे प्रेमसंबंध आहेत. तरुणी अन्य युवकासोबत बोलत असल्याचे राहुल याला खटकायचे. त्याने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. अन्य युवकासोबत बोलल्यास तुझे अश्लील व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तरुणीने सदर पोलिसांत तक्रार दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT