knife pierced the boy stomach during the wedding ceremony 
नागपूर

लग्नसमारंभात राडा : जेवणाच्या टेबलावर बसण्याच्या वादातून तिघांनी युवकाच्या पोटात भोसकला चाकू

अनिल कांबळे

नागपूर : कडबी चौकातील मंगल मंडप सभागृहात सुरू असलेल्या लग्नसमारंभात दोन गटात राडा झाला. जेवणाच्या टेबलावर बसण्याच्या वादातून तिघांनी युवकावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद आरिफ सय्यद (वय २५, रा. मोमीनपुरा) असे जखमीचे नाव आहे.

आरिफचा मित्र अफजल शेख गौस शेख (वय १९ रा. मोमीनपुरा) याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी रज्जाक शेख, शाहीद व साथीदाराविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोमीनपुऱ्यातील एका युवकाचे मंगल मंडप येथे लग्न होते. अफजल, आरिफ व त्याचे साथीदार लग्न समारंभाला गेले.

रात्री दहाच्या सुमारास आरिफ व अफजल टेबलावर बसून जेवण करीत होते. रज्जाक, शाहीद व त्याचा साथीदार असे तिघे आले. त्यांनी अफजलला टेबलावरून उठायला लावले. अफजलने नकार दिला. तिघांनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली.

जेवण केल्यानंतर अफजल व आरिफ सभागृहात बाहेर निघाले. मोटरसायकल काढताना रज्जाक त्यांच्याजवळ आला. रज्जाक याने शिवीगाळ करीत अफजल याला मारहाण करायला सुरुवात केली. आरिफ अफजलला वाचविण्याचा प्रयत्न करू लागला. याचवेळी रज्जाक व त्याच्या साथीदारांनी आरिफला पकडले.

त्यालाही मारहाण करायला लागले. रज्जाकने आरिफच्या पोटात चाकू खुपसला व तिघेही पसार झाले. जखमी आरिफला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जरीपटका पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तीन हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किती? पाहा ताजे रेट

Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

गोविंदा कोमल रानीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला, नेटकरी चिडले! 'सुनीताजींना आणायला हवं होतं'

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

SCROLL FOR NEXT