Know about Asthvinayak in Vidrbha region Aadasa Shami Vighnesh  
नागपूर

Video: उंच टेकडीवर विराजमान आदासा येथील 'शमी विघ्नेश'..काय आहे त्याची महिमा.. जाणून घ्या 

मनोहर घोळसे - विजय पांडे

सावनेर (जि. नागपूर) : श्री क्षेत्र आदासा नागपूर पासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे, पुराणात उल्लेखित या क्षेत्राचे प्राचीन नाव म्हणजे ”अदोष क्षेत्र”. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा गाव जवळ उंच पर्वतावर विघ्नहर्त्याचे प्राचीन मंदिर आहे. आदासा हे क्षेत्र अतिप्राचीन असून या क्षेत्राची महिमा वामन पुराणात आढळून येते. येथील गणपतीची प्रतिमा ही प्राचीन असून वामनाने ही मूर्ती स्थापित केल्याचा उल्लेख वामन पुराणात दिसून येतो. येथील गणपती हा ”शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती” नावाने प्रसिद्ध आहे.

परिसरालगत कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील एका उंच टेकडीवर हजारो वर्षापासून असणारे गणेश मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभल्याने चमत्कारिक प्राचीन व जागृत देवस्थान मानले जाते या  विदर्भाच्या प्रसिद्ध देवस्थानातील दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त येत असल्याने येते दर्शनासाठी रांगा लागतात.

मंदिर समितीने केलेल्या नियोजनबद्ध सोयीसुविधा व जवळपास अकरा एकर क्षेत्रातील मनमोहक व निसर्गरम्य परिसर यामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ घोषित झाले आहे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते यातून हॉटेल, पूजेचे साहित्य विक्री दुकाने, इतर वस्तूंच्या विक्रीची दुकाने तसेच देखरेखीसाठी कार्यरत कर्मचारी असा अनेकांना रोजगार मिळाला आहे मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वांचाच हिरमोड झाला आहे

विदर्भातील आठ महत्त्वाच्या क्षेत्रातील श्री गणेशाच्या मंदिराच्या संचाला अष्टविनायक म्हटले जाते आदासा हे त्या अष्टविनायकातील शमी विघ्नेश गणपती देवस्थान म्हणून ओळखल्या जाते येथील गाभाऱ्यातील बारा फूट उंच सहा फूट रुंद असलेली जागृत गणेश मूर्ती असल्याचे परिसरातील गणेश भक्त सांगतात.

या मंदिराचे ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्त्व सांगणारी आख्यायिका अशी आहे महापाप, संकष्ट या दानवांनी त्राहि त्राहि करून सोडल्याने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी देवांनी शंकर-पार्वती रुपि असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या  दानवांना संपवले याच शमी वृक्षाखाली मृदगल ऋषींनी गणेश मूर्तीची स्थापना केली दुसरी आख्यायिका अशी चर्चेत आहे की औरंगजेबाच्या काळात मंदिर तोडण्याचा झालेला प्रयत्न येथील पुजाऱ्याच्या चमत्कारामुळे विफल ठरला होता अश्या या चमत्कारी व जागृत गणेशाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीला भाविकांची मोठी यात्रा भरत असते गणेशोत्सवामध्ये ही याठिकाणी असंख्य नागरिक पूजा-अर्चनासाठी जातात.

मात्र यंदा  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीचे ठिकाण टाळण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आल्याने सण उत्सव घरीच साजरे करावे लागत असल्याने  आदासा येथील गणेशाच्या दर्शनासाठी असंख्य गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Traffic Safety : नाशिकमधील अपघातांना बसणार लगाम; महापालिकेची 'ब्लाइंड स्पॉट' निर्मूलन मोहीम!

Homemade Dhoop: बाजारच्या धूपाला म्हणा रामराम! आजच घरी बनवा केमिकल-फ्री धूप; जाणून घ्या सोपी पद्धत

Gautam Adani : शरद पवार हे माझे गुरु अन् मार्गदर्शक; गौतम अदानी यांचे गौरवोद्गार

Ravindra Chavan: जागावाटपावरून महायुतीत तणाव! भाजप आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांचे सूचक संकेत

Latest Marathi News Live Update : एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT