Land of Koradi mandir sold to unknown without Deed of sale 
नागपूर

धक्कदायक! विक्रीपत्र न करताच कोराडी जगदंबा मंदिराची जमीन केली दुसऱ्याच्या नावे; पोलिसांत तक्रार दाखल 

राजेश चरपे

नागपूर : विक्रापत्र न करताच कोराडी जगदंबा मंदिराची जमीन एक संस्थेच्या नावे करण्यात आली. यात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप करीत कामठी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची माहिती ॲड. सतीश उके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. उके यांनी सांगितले की, कोराडी मंदिराची पाच एकर जागा शैक्षणिक संस्थेला देण्यात आली. हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीरपणे करण्यात आला. जगदंबा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने जागा देण्याचा ठराव घेतला. हा ठराव जुन्या तारखेत दाखविण्यात आला. 

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ही जागा संस्थेला ९० वर्षांच्या भाडेतत्त्वावर साडेतीन कोटी रुपयांत देण्यात आली. पहिल्या ३० वर्षात ५० लाख, दुसऱ्या ३० वर्षात १ कोटी तर तिसऱ्या तीस वर्षात दीड कोटी रुपये घेण्यात येणार आहे. 

खोट्या माहितीच्या आधारे दुय्यम निबंधक, कामठी यांच्याकडे दस्त तयार करून घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नसलेली अटी व शर्ती बेकायदेशीरपणे लिहून संस्थेला जमीन महसूल भरण्याचे अधिकार दिले. संस्थेच्या अर्जावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन अकृषक करण्याचे प्रमाणपत्र दिले. 

तसेच श्री महालक्ष्मी जगदम्बा संस्थान, कोराडी-जाखापूर यांच्या नाव सातबारावरून काढून भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांचे नाव चढविण्यात आले. कोणत्याही विक्रीपत्राशिवाय ही जागा संस्थेच्या नावे करण्यात आली.

यात उपविभागीय अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकऱ्यांनी चुकीची फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्य नाना कंभाले यांनी केली. यावेळी बेलेकर व पटोले उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT