नागपूर

'तो' बिबट्या नक्की गेला तरी कुठे? तीन दिवस उलटूनही शोध लागेना

अथर्व महांकाळ

नागपूर : २८ मे साधारणतः दुपारची वेळ उपराजधानीत (Nagpur City) एकच खळबळ उडाली. कारण होतं ते बिबट्याचं (Leopard in Nagpur). गायत्री नगर आणि आयटी पार्कसारख्या (Nagpur IT Park) घरांनी गजबजलेल्या परिसरात सकाळच्या सुमारास काही नागरिकांनी बिबट्याला बघितल्याचा दावा केला. मग काय संपूर्ण शहरात हीच चर्चा. वनविभागाच्या टीमला (Forest department Nagpur) पाचारण करण्यात आलं, ट्रॅप बसवण्यात आले. मात्र तब्बल ३ दिवस उलटूनही बिबट्याचा शोध लागला नाहीये. (Leopard in Nagpur still not found after 3 days)

शहरात बिबट्या शिरल्याचं समजताच लॉकडाउनमध्ये घरात दडून बसलेले सर्वच हौशी आयटीपार्कजवळ पोहोचले. मग काय चर्चांना उधाण आलं. प्रत्यक्षदर्शींकडून बिबट्याबद्दल माहिती जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक होता.

श्री. चकोले यांच्या म्हणण्याप्रमाणे बिबट्यानं त्यांच्या पायाला पंजा मारला. तर काही ठिकाणी बिबट्याचा पंजा आणि ओरखडण्याचे ठसेही दिसले. वनविभाग घटनास्थळी आल्यानंतर पाहणी करण्यात आली. परिसर संपूर्ण सील करून ट्रॅप्स बसवण्यात आले. मात्र बिबट्या काही गवसला नाही.

रात्रभर ट्रॅप लावूनही बिबट्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसला नाही. मात्र एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मध्यरात्रीनंतर झाडांमध्ये बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतरही वन विभागानं शोध घेतला मात्र बिबट्या सापडला नाही.

आज तब्बल ३ दिवस उलटून गेले तरी बिबट्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हुलकावणी देतोय. मात्र यात अफवांचा बाजार उठतो आहे. अनेक जणांकडून बिबट्या बघितल्याचा दावा करण्यात येतोय. काहींच्या म्हणण्याप्रमाणे बिबट्या त्याच्या अधिवासात परतला आहे तर तो नक्की व्हीएनआयटीच्या कॅम्पसमध्ये आहे असं काही जणांकडून सांगण्यात येतंय.

या सगळ्या गुंतागुंतीत परिसरातील नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. एरवी घराबाहेर शतपावली करणाऱ्या नागरिकांमध्ये आता बिबट्याची दहशत आहे. लहान मुलंही भीतीनं घरातच आहेत.

३ दिवस उलटूनही बिबट्याचा थांगपत्ता लागत नाहीये. त्यामुळे जोपर्यंत हा बिबट्या वनविभागाच्या तावडीत सापडत नाही तोपर्यंत जीवात जीव येणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

(Leopard in Nagpur still not found after 3 days)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT