Light rain in Nagpur Light rain in Nagpur
नागपूर

नागपुरात पावसाचा शिडकावा; ढगाळ वातावरण, मेघगर्जना

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विदर्भात उन्हाची तीव्र लाट असताना अवकाळी पावसाचेही सावट निर्माण झाले होते. प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास हलके वारेही वाहत होते. अशात रात्री नऊ वाजताच्या सुमारास पावसाच्या रिमझिम सरी पडल्या. यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. (Light rain in Nagpur)

रात्री उशिरा मानेवाडा परिसरात हलका पाऊस पडल्याची माहिती आहे. तसेच बेसा परिसरात काही थेंब पडल्याचे समजते. मात्र, विजेचा कडकडाट सुरूच होता. मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) पडतो की काय असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. सकाळपासून असलेले ढगाळ वातावरण सायंकाळपर्यंत कायम होते. तसेच वारेही वाहत होते. यामुळे चांगला पाऊस येईल असे वाटत होते. शहरातील काही परिसर सोडला तर इतरत्र पाऊस पडला नाही.

‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या स्थितीमुळे दक्षिण भारतातील तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. विदर्भातही कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवणार होता. बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसा इशारा हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता.

किंचित का होईना वातावरणात बदल

एप्रिल महिन्यातच ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचलेल्या विदर्भातील तापमानाने अनेक शहरांमध्ये अघोषित संचारबंदीचे स्वरूप आणले होते. भरदिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाले होते. यानंतर किंचित का होईना वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे तापमानात थोडी घट होत आहे. शहरातील तापमान मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस होते. सहा मे पर्यंत ढगाळी वातावरणामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT