नागपूर

नागपूर ब्रेकिंग : शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन; पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज १,२०० ते १,६०० जवळपास रुग्ण आढळून येत आहे. यामुळे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काहीही केल्या यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. नागरिकही बिनधास्त शहरात वावरताना दिसत आहे. लग्न समारंभ, खाजगी कार्यक्रमात नागरिकांची गर्दी चांगलीच वाढली आहे. यामुळे कोरोना चांगलाच पसरत आहे. 

यामुळे २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला होता. शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती. यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले होते. नागपुरातील भयावह स्थितीवर महत्त्वाची बैठक पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मेडिकल, मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी उपस्थित होते. यानंतर शहरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

हे राहतील सुरू व बंद

  • अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
  • भाजीपाल्याची दुकाने सुरू राहील
  • खाजगी कार्यालय बंद
  • सरकारी कार्यालय २५ टक्केच उपस्थिती
  • उद्योग सुरू राहतील
  • बँक पोस्ट ऑफीस सुरू राहतील
  • दारू दुकान बंद, ऑनलाइन सुरू
  • खाद्य पदार्थ घरपोच राहील
  • लसीकरण सुरू राहील
  • लोकप्रतिनिधींनी जाण्या येण्याची सोय करावी
  • गृहविलगीकरण असल्याची तपासणी बाहेर दिसताच कारवाई
  • डोळे रुग्णालय व चष्म्याची दुकाने सुरू राहील
  • २१ पूर्वी पुन्हा बैठक
  • आमदार निवास विलगीकरण केंद्र

पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश

नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ६२ हजारांवर पोहोचली आहे. यामुळे १५ ते २१ मार्चपर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान विनाकारण नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसल्यात कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT