Lok Sabha Election 2024  esakal
नागपूर

Lok Sabha Election 2024: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपची तयारी? काँग्रेस आमदाराने घेतली फडणवीसांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

General Parliment election 2024: शिंदे अन् अजित पवार लोकसभेच्या किती जागा लढणार हे स्पष्ट झालं नाही. महायुतीत जागावाटपावरुन अजूनही धुसफूस सुरु आहे.

Sandip Kapde

Lok Sabha Election 2024:


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपने महाराष्ट्रात २० जागांची यादी जाहीर केली. तर अजूनही शिंदे अन् अजित पवार किती जागा लढणार हे स्पष्ट झालं नाही. महायुतीत जागावाटपावरुन अजूनही धुसफूस सुरु आहे.

दरम्यान उमरेडचे आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर आहेत.  राजू पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीसांच्या नागपुरातील निवास्थानी दोघांची भेट झाली आहे. अर्धात तास यांच्या चर्चा झाली. (Latest Marathi News)


काय चर्चा झाली ?


रामटेक मतदार संघात राजू पारवे महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे की राजू पारवे महायुतीच्या वाटेवर आहेत. तसेच रामटेक लोकसभा लढवण्यास ते इच्छुक आहेत. त्यामुही ही भेट अत्यंत महत्वाची आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील या मतदार संघात निवडणूक लढवण्यात इच्छुक असल्याची चर्चा आहे. रामटेक मतदार संघात विद्यमान खासदार कृपात तुमाने हा उमेदवार बदलला जावा, असा भाजपचा आग्रह आहे. पहिली मागणी तो मतदारसंघ भाजपला मिळावा. दुसरा आग्रह किमान उमेदवार बदलावा. त्यामुळे नवीन उमेदवार म्हणून राजू पारवे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT