Maharashtra Assembly Winter Session 2023 Esakal
नागपूर

Maharashtra Assembly Winter Session 2023: सत्ताधारी जोमात; विरोधक बॅकफूटवर! तिसऱ्या आठवड्याचे आजपासून कामकाज विरोधक काढणार मंत्र्यांची प्रकरणे?

Maharashtra Assembly Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्ष आक्रमक आणि वरचढ दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्ष आक्रमक आणि वरचढ दिसून आले. सत्ताधारी आमदारांनीच मुद्दे काढत विरोधी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मंत्र्यांची विविध प्रकरणे काढण्याचा इशारा अधिवेशनापूर्वी दिला होता. मात्र, सुरुवातीच्या दोन आठवड्यांत एकही प्रकरण बाहेर आले नाही. त्यामुळे तिसऱ्या व शेवटच्या आठवड्यात विरोधक कोणत्या मंत्र्यांची कोणती प्रकरणे बाहेर काढतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सत्ताधारी तीन पक्षांत अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी त्याचा फायदा अद्याप तरी विरोधकांना घेता आल्याचे दिसून आले नाही. उलट पुरवणी मागण्यातील निधी वाटपावरून विरोधकांमधीलच मतभेद दिसून आले. माजी मंत्री नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची प्रयत्न विरोधकांनी केला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिले. त्यामुळे अजित पवार गट अडचणीत आला. (Marathi Tajya Batmya)

दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी दिशा सॅलियनचा मुद्दा वर काढत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर सलीम कुत्ताच्या प्रकरणावरून पुन्हा ठाकरे गटाची कोंडी करण्‍याचा प्रयत्न केला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांची प्रकरणे काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक आक्रमक पवित्रा घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु पहिल्या दोन्ही आठवड्यांत तसे दिसून आले नाही. सोमवारपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होणार असून ते तीनच दिवस चालणार आहे.(Latest Marathi News)

विरोधकांचे शस्त्र बोथट करण्यात यश

शेतकऱ्यांचा मुद्दाच विरोधकांनी जोरकसपणे लावून धरला. त्यांनी धारावीच्या मुद्दाही उपस्थित केला. शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना विरोधकांचे शस्त्र बोथट करण्यात यश आले. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT