Maharashtra government Cabinet Expansion 
नागपूर

उपराजधानीतील इच्छुकांची वाढली धाकधूक!

किती जणांना करायचे मंत्री? : भाजपसमोर पेच

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालल्याने नागपूर जिल्ह्यातील अनेक इच्छुक आमदार अस्वस्थ झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? तो केव्हा होणार? याचे उत्तर कुणाचजवळ नाही. तसेच एकाच जिल्ह्यातून किती मंत्री करायचे? असा प्रश्न भाजपला पडला आहे. त्यामुळे अनेकांचा जोश उतरत चालला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करून महिना उलटला आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष मुहूर्त निघत नसल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे. आता हे सरकार टिकणार नाही, अशीही भीती वर्तविली जात आहे. दुसरीकडे विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सरकारला धारेवर धरले आहे. विरोधक दिल्लीकडे बोट दाखवत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या पाच ते सात फेऱ्या केल्याने मंत्रिमंडाळाची यादी दिल्लीतून फायनल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणाचा नंबर लागले आणि कोणाचा कटेल याची कोणालाच शाश्वती राहिली नाही.

गुजरातमध्ये भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळच बदलले आहे. सर्व जुन्यांना बाजूला सारून नव्यांना संधी दिली आहे. हाच प्रयोग महाराष्ट्रात केल्यास मोठा फटका माजी मंत्र्यांना बसू शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोटाळ्याचा ठपका असलेल्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नाही, अशी अट टाकली आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या आमदारांची अडचण झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या साऱ्या चर्चा आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात फरक आहे. गुजरातेत भाजपचे बहुमताचे सरकार असल्याने तेथे हा प्रयोग करता आल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हे खरे नाही तर मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? याचे उत्तर मात्र भाजपच्या नेत्यांकडे नाही.

बावनकुळे, दटके आघाडीवर

नागपूर जिल्ह्यातून अग्रकमाने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांची नावे आघाडीवर आहेत. ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून आमदार आशिष जयस्वाल यांचे नाव निश्चित समजल्या जातो. दुसरीकडे हिंगण्याचे आमदार समीर मेघे, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचीही नावे चर्चेत आहेत. देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री असताना एकाच जिल्ह्यातून इतके नेते मंत्रिमंडळात घेणे अवघड तसेच राजकीय सोयीचे नसल्याने मोठ्या नेत्यांच्या नावावर कात्री लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT