Pashmi Hound to Support Farmers sakal
नागपूर

Pashmi Hound to Support Farmers: शेतकऱ्यांना मिळणार राजेशाही शिकारीचा साथी 'पश्मी' श्‍वान; देशात फक्त ५ हजार, माफसू करणार स्वतंत्र नोंदणी

How Maharashtra Farmers Will Benefit From Pashmi Hounds: राजेशाही वारसा लाभलेला दुर्मीळ 'पश्मी' श्‍वान शेतकऱ्यांचा साथी होणार असून, माफसूकडून स्वतंत्र नोंदणी सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Government Plans to Register Royal Pashmi Hounds: राजेशाहीच्या काळात युद्ध आणि शिकारीसाठी उपयोगी ठरणाऱ्या पश्‍मी प्रजातीच्या श्‍वानांना ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे.

पश्‍मी श्‍वानाचा १९२५ पासून शिकारीसाठी उपयोग होत असल्याच्या नोंदी २००८ या वर्षातील लातूर गॅझेटमध्ये आढळतात. आजघडीला भारतभरात या प्रजातीचे केवळ पाच हजार श्‍वान आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, डो. सुधीर राजूरकर व डॉ.नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात या श्‍वानाच्या संदर्भाने माहिती संकलनाचे काम होती घेण्यात आले आहे. पश्‍मी श्‍वानासंदर्भात डॉ. पंडित नांदेडकर यांनी सांगितले की, जाणवळ (ता. चाकूर, लातूर) व आजूबाजूचे भाग पश्‍मी श्‍वानाचे मूळ आहे.

लातूर, परभणी, नांदेड, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे सह महाराष्ट्राच्या इतर जिल्हयात ते आढळतात. कर्नाटक, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, दिल्ली, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल व आंध्रप्रदेश राज्यातही त्यांना संरक्षण व शिकारीकामी नेण्यात आले. श्‍वानास जाणवळ पश्‍मी, भारतीय हौउंड नावानेही ओळखले जाते. हिंस्र वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यास बचावाकरिता या श्‍वानाच्या कॉलर बेल्टला खिळे लावले जात होते.

पश्मी श्‍वानाची वैशिष्ट्ये

पश्‍मी श्वानाचे कान, पंजा, मांडीवर जास्त प्रमाणात केस आढळतात. वातावरणानुसार केस वाढ दिसते. प्रामुख्याने रंग काळा, राखडी, सोनेरी, कत्था, पांढरा असतो. मान बारिक, लवचिक, ओठ घट्ट चिकटलेले, कान लांब व खालील बाजूस झुकलेले, शेपटीच्या टोकाशी अंगठीप्रमाणे अर्थ वेटोळा असतो. २४ ते ३० इंचापर्यंत वाढ होऊन १७ ते ३८ किलो वजनाचे असतात. चपळ, सहनशक्‍ती खूप, शांत, धाडसी, अलर्ट अशी अनेक वैशिष्ट्ये या श्‍वानाशी निगडित आहेत.

- राखणदारी आणि शिकार या दोन्ही कामासाठी या श्‍वानाचा उपयोग.

- मेंढपाळ शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाच्या संरक्षणासाठी कारवान श्‍वान वापरतात.

पश्‍मी जातीचे नर पिल्लू ९ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत तर मादी पिल्लू ६ हजार ते ७ हजारापर्यंत विकले जाते.लातूर गॅझेटमध्ये पश्‍मी श्‍वानाचा १९२५ पासून शिकारीसाठी उपयोग होत असल्याच्या नोंदी आहेत. पश्‍मी श्वान नोंदणी प्रस्ताव राष्ट्रीय पशू अनुवांशिक संशोधन ब्यूरो (कर्नाल, हरियाणा) येथे डिसेंबरमध्ये दाखल केला गेला आहे. येथील शास्त्रज्ञांच्या चमूने सप्टेंबरमध्ये लातूर व आजूबाजूच्या भागात हे श्वान जैवविविधता सांभाळून असल्याचे मत नोंदविले होते.

- डॉ. पंडित नांदेडकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT