Mahavitaran
Mahavitaran esakal
नागपूर

Mahavitaran : वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका, महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Mahavitaran : वीज वाहिन्या, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्यात येत असल्याने वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारे प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. सोबतच विज वितरण कंपनीला मन:स्तापही सहन करावा लागतो. जनतेच्या पैशाचाही अपव्यय होतो, यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये तसेच तो जाळू नये असे आवाहन महावितरणने केले आहे

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, रोहित्र, डीपी अशा वीज यंत्रणा उघडयावर आहेत. या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित होतो. दिवसेंदिवस पारा वाढत असल्याने कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. असे प्रकार दिसून आल्यास तसेच वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२ किंवा १९१२०, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला सुचना द्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

नरेंद्रनगर भागातील बोरकुटे लेआऊट येथील लक्ष्मीकांत पोच्छी यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या सुमारास पंपाच्या ऑटो स्टार्टरमध्ये स्फोट झाला. लाकडी कार्डबोर्ड व इतर साहित्याने पेट घेतला. यामुळे संपूर्ण वायरिंग व मीटर जळाले. अश्या घटना टाळण्यासाठी ऑटो स्टार्टरच्या जोडणीची नियमित तपासणी करा अशी माहितीही देण्यात येत आहे.

शॉर्ट सर्किटचा धोका

घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अती गरम झाल्याने शॉर्ट सर्किटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्किट होतो. इलेक्ट्रिकल आउटलेट्स किंवा एक्स्टेंशन कॉड ओव्हरलोड झाल्यास, याशिवाय वायरिंगमध्ये कित्येक वेळी सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोडवर कार्बन चढते.

तसेच घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते. प्रसंगी शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची संभावना असते. अशावेळी मेन स्विच बंद करावा. पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT